वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. अमेरिका, युरोपमधील देश इस्रायलसोबत आहेत, तेच इस्लामिक आणि अरब देश पॅलेस्टाइनच समर्थन करतायत. मागच्या 10 दिवसांपासून सुरु असलेलं हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता कमी आहे. या युद्धादरम्यान सौदी अरेबियाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थतेने सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये एक डील होणार होती. सौदी अरेबियाने आता या डीलमध्ये फार उत्साह दाखवलेला नाहीय. इस्रायलसोबच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर सुद्धा काही म्हटलेलं नाहीय. सौदी अरेबियावर अंतर्गत दबाव आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन सौदी क्राऊन प्रिन्सला भेटण्यासाठी पोहोचले, त्यावेळी त्यांना अनेक तास वाट पहावी लागली. सौदी अरेबियाची नाराजी म्हणून याकडे पाहिल जातय.
सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायल-हमास युद्धाचा निषेध केलाय. हे युद्ध संपवण्याची सलमान यांची मागणी आहे. या युद्धासंबंधी अमेरिकेची रिक्वेस्ट सौदीने धुडकावून लावली आहे. अरब देशांनी हमासची निंदा करावी, अशी अमेरिकेची मागणी होती. पण सौदीने असं करण्यास नकार दिला. सुरुवातीपासून आम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने राहिलोय, असं सौदीच म्हणण आहे. युद्धानंतर सौदी अरेबियाने इस्रायलसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा आपला निर्णय बदललाय का? हा प्रश्न विचारला जातोय.
पण असं घडलं नाही
मागच्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. क्राऊन प्रिन्सच्या राजवाड्यातून त्यांना अपमानास्पद होऊन बाहेर पडाव लागलं. ब्लिंकन संध्याकाळी सौदी क्राऊन प्रिन्सला भेटण्यासाठी पोहोचले होते. दोन्ही नेत्यांची भेट तेव्हाच होईल, अस वाटलं होतं. पण असं घडलं नाही. ब्लिंकन यांना संपूर्ण रात्र वाट पाहावी लागली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ब्लिंकन यांची भेट घेतली. अमेरिकन वर्तमानपत्राने हा दावा केला आहे.
अमेरिकेचा मोठा अपेक्षाभंग
ब्लिंकन यांनी जी अपेक्षा होती, त्यावर सौदीने पाणी फिरवलं. हमासने इस्रायलवर जो हल्ला केला, त्याची क्राऊन प्रिन्सने निंदा करावी अशी ब्लिंकन यांची इच्छा होती. युद्धात सौदीने इस्रायलच्या बाजूने उभं रहाव अशी त्यांची इच्छा होती. पण असं झालं नाही. सौदी क्राऊन प्रिन्सने युद्धाबाबत इराणशी सुद्धा चर्चा केली. इराण हमासच्या बाजूने आहे.