Israel hamas war : हमासचे दहशतवादी आणि इस्रायली सैनिक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. परदेशी नागरिकांनाही ते लक्ष्य करत आहेत. शनिवारपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत जगभरातील 44 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून, तीन भारतीय नागरिकांसह सुमारे 150 परदेशी नागरिक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर पाच हजार रॉकेटने हल्ला केला होता. गाझावरुन करण्यात आलेला हल्ला इतका मोठा होता की, इस्रायलची हवाई विरोधी संरक्षण यंत्रणाही अपयशी ठरली. याशिवाय हमासचे दहशतवादी इस्रायलच्या सीमेवरुन ही घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले. हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे 1200 लोक मारले गेले. तर हजारो लोकं जखमीही झालेत.
हमासच्या या हल्ल्यांमध्ये 44 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे, 150 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती इस्रायल सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार दिली आहे. बेपत्ता परदेशी नागरिकांमध्ये तीन भारतीयांचाही समावेश आहे.
इस्रायल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास युद्धात तटस्थ राहिलेल्या रशियाचे सर्वाधिक १६ नागरिक बेपत्ता आहेत, येथील २ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे, तर चीनचे २ नागरिक मारले गेले आहेत तर ३ बेपत्ता आहेत.
हमासच्या हल्ल्यात अमेरिका, रशिया आणि चीन व्यतिरिक्त फ्रान्सचे 9 नागरिक ठार झाले असून 14 बेपत्ता आहेत, थायलंडचे 9 नागरिक बेपत्ता आहेत, तुर्कीचा एक नागरिक मरण पावला असून एक बेपत्ता आहे, युक्रेनचे 7 नागरिक ठार झाले आहेत, 9 बेपत्ता आहेत, 2 यूके, 1 अझरबैजान, 1 अर्जेंटिना, 2 बेलारूस, 2 ब्राझील, 2 दक्षिण आफ्रिकेतील, 3 स्पेन, 2 हंगेरी. कॅनडा, सुदान आणि फिलिपाईन्समधील प्रत्येकी एक नागरिक ठार झाला आहे. पुष्टी केली आहे. या देशांमध्ये अर्जेंटिनाचे सर्वाधिक 23 नागरिक बेपत्ता आहेत, याशिवाय यूकेचे 12, इटलीचे 10 आणि जर्मनीचे 7 नागरिकांसह सुमारे 150 लोक बेपत्ता आहेत.