Israel vs Hamas war : इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमास आणि इस्रायल यांच्यात सुरु झालेलं युद्ध अजूनही सुरुच आहे. हमासने अनेकांना ओलीस ठेवले आहे. त्यातच आता हमासने इस्रायलला पुन्हा एकदा उघड धमकी दिली आहे. ते पुन्हा इस्रायलवर हल्ले करणार असे हमासने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ‘इस्रायलला धडा शिकवणे आवश्यक आहे’ असे म्हटले आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले होते. तेव्हापासून दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष वाढला तर हे जगभरातील देशांना परवडणारे नाही. कारण दोन्ही देशांसोबतच्या व्यवहार पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे अनेक वस्तूच्या किंमती ही वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायली मीडिया ynet नुसार, लेबनॉनच्या LBC टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गाजी हमद म्हणाला की, ‘अल अक्सा फक्त पहिल्यांदाच आला पण त्यानंतर तो दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदाही होईल. 7 ऑक्टोबरला जे काही घडले त्यासाठी हमासला जबाबदार धरू नये. आम्ही जे केले ते योग्य केले.”
हमाद म्हणाला की, ‘इस्रायल हा असा देश आहे ज्याला आपल्या भूमीवर स्थान नाही. आम्हाला तो देश काढून टाकायचा आहे. आम्हाला इस्रायलला धडा शिकवायचा आहे आणि आम्ही ते पुन्हा पुन्हा करू.
हमास नेता म्हणाला, ‘आम्हाला किंमत मोजावी लागली तर? तर होय आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. आम्हाला हुतात्म्यांचा देश म्हटले जाते आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे. “आम्ही नागरिकांना इजा पोहोचवू इच्छित नाही. हा कब्जा केवळ गाझामध्येच नाही तर संपूर्ण पॅलेस्टाईनच्या भूमीवर संपला पाहिजे.
इस्रायलने गाझामध्ये सुरू असलेल्या लष्करी मोहिमेत हमासची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. इस्रायलने आतापर्यंत हमासचे 11,000 ठिकाणे उद्ध्वस्त केले आहेत. हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलने युद्धनौका ही या युद्धात उतरवल्या आहेत. तेथूनही हमासला लक्ष्य केले जात आहे.