Israel-Hamas war | गाझा पट्टीत आमने-सामनेची लढाई सुरु झाल्यावर काय होईल? जाणून घ्या

| Updated on: Oct 12, 2023 | 1:26 PM

Israel-Hamas war | गाझा पट्टीत इस्रायलला एकाचवेळी दोन ठिकाणी युद्ध लढाव लागेल. हमासने जी हरकत केलीय, ती खूप विचारपूर्वक केलीय. याचे काय आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

Israel-Hamas war | गाझा पट्टीत आमने-सामनेची लढाई सुरु झाल्यावर काय होईल? जाणून घ्या
israel hamas war
Follow us on

जेरुसलेम : हमासने शनिवारी इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला केला. हमासच्या या कृतीमुळे इस्रायल प्रचंड खवळला आहे. इस्रायली सैन्य कधीही गाझा पट्टीत घुसू शकतं. गाझाच्या सीमेवर इस्रायली सैनिक जमले आहेत. इस्रायलचे रणगाडे सुद्धा तिथे सज्ज आहेत. फक्त ऑर्डरची प्रतिक्षा आहे. हमासच्या हल्ल्यात 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे बदला घ्या, हीच भावना इस्रायली जनतेची आहे. हमासला संपवण्याच चंग इस्रायलने बांधलाय. पॅलेस्टाइनला लक्षात राहील, असा धडा शिकवायच इस्रायलचा उद्देश आहे. सध्या इस्रायलकड़ून फक्त हवाई कारवाई सुरु आहे. इस्रायलची फायटर विमान गाझा पट्टीत बॉम्ब फेक करत आहे. पण येणाऱ्या दिवसात या लढाईच स्वरुप आणखी व्यापक होणार आहे. गाझा पट्टीत इस्रायली फौजा घुसल्याने खऱ्या युद्धाला सुरुवात होईल. इस्रायली सैन्याकडे गाझा पट्टीचे सर्व नकाशे आहेत. त्यामुळे तिथे काय स्थिती आहे, याची इस्रायली लष्कराला कल्पना आहे.

संपूर्ण गाझा पट्टी याआधी सुद्धा इस्रायलने ताब्यात घेतली होती. पण गाझामध्ये घुसून युद्ध लढण तितक सोप नाहीय. गाझा पट्टी हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. इथे इमारती खेटून उभ्या आहेत. गाझा जेवढं वर दिसत, तेवढच जमिनीखाली सुद्धा आहे. तिथे जमिनीखाली अनेक बोगदे, बंकर बांधलेले आहेत. गाझात घुसल्यानंतर आमने-सामनेची लढाई सुरु होईल. इस्रायलकडे कितीही अत्याधुनिक शस्त्र असली, हमासचे दहशतवादी मारले गेले, तरी इस्रायलला सुद्धा नुकसान सहन कराव लागू शकतं. त्यामुळे जमिनीवरची लढाई वाटते तितकी सोपी नाहीय. हमासने जी हरकत केलीय, ती खूप विचारपूर्वक केलीय. याचे काय आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हमासचे दहशतवादी सुद्धा गाझा पट्टीत या लढाईसाठी तयार असणार. अशावेळी गाझा पट्टीत घुसण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल.

आमने-सामनेची लढाई सोपी नसेल, कारण….

मोठ्या युद्धाची सुरुवात करताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा इस्रायलला ठरवावा लागेल. रशिया-युक्रेन युद्ध त्याच उत्तम उदहारण आहे. काही दिवसात हे युद्ध संपेल असं बोलल जात होतं. पण आता दीड वर्ष होत आलं, तरी अजूनही युद्धा सुरुच आहे. कारण एकदा युद्ध सुरु झालं की, त्यात आपला फायदा शोधणारे बरेच असणार. आताच इस्रायल विरोधात अरब आणि मुस्लिम देशांची एकजूट दिसू लागली आहे. हे सर्व घटक एकत्र आले आणि त्यातले काही देश युद्धात उतरले, तर इस्रायलची मुश्किल वाढू शकते. त्यामुळे आमने-सामनेची लढाई सोपी नसेल.