पश्चिम आशियात तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी राजधानी तेल अवीव येथे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत इराणकडून इस्रायलवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि इराणला कसे उत्तर द्यायचे याबाबत चर्चा झाली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी आज दुपारी सुरक्षा सल्लागारांची चर्चा केली. इस्रायलच्या हवाई दलासह अमेरिकी नौदलाचे विनाशक सक्रिय झाले आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, इराणने मोठी चूक केली असून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, इराणच्या हल्ल्यामुळे तणाव धोकादायक पातळीवर वाढला आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आम्ही केव्हा, कुठे आणि कसे प्रतिसाद देऊ. आता यावर इस्रायल सरकार निर्णय घेईल.
इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्रायलमध्ये घडमोडींना वेग आला आहे. आयडीएफने दक्षिण लेबनॉनमधील २० ते २५ गावांना ताबडतोब घरे सोडण्याचे आवाहन केले आहे. आयडीएफचे प्रवक्ते कर्नल अवचय अद्राई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हिजबुल्लाहच्या कारवाया आयडीएफला त्याविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडत आहेत. IDF तुम्हाला नुकसान करू इच्छित नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही ताबडतोब घरे रिकामी करा. जो कोणी हिजबुल्लाह कार्यकर्त्यांच्या जवळ आहे ते स्वत:ला धोक्यात आणू शकतात.
आयडीएफ सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील जवळपास २५ गावांसाठी हे आदेश जारी केलेत. . ताज्या अपडेटनुसार, IDF ने बुधवारी सांगितले की त्यांनी हवाई हल्ल्यात 150 हून अधिक दहशतवादी संरचना नष्ट केल्या आहेत, ज्यात हिजबुल्ला मुख्यालय, शस्त्रास्त्रे आणि रॉकेट लाँचर्स यांचा समावेश आहे.
एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, खामेनेई शनिवारपासून इराणमध्ये सुरक्षित ठिकाणी राहत होते. मंगळवारी इस्रायलवर सुमारे 200 क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिल्यानंतर आता ते सुरक्षित स्थळी आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की हा हल्ला नसराल्लाह आणि निलफोरौशन यांच्या मृत्यूचा बदला होता. जुलैमध्ये तेहरानमध्ये हमास नेता इस्माईल हानियाची हत्या आणि लेबनॉनवर इस्रायलच्या हल्ल्याचाही या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. इस्रायलने हानियाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारलेली नाही.