इस्त्रायल आणि इराणचा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी इराणने इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्र डागले डागले. त्यानंतर इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आम्ही सोडणार नाही? जोरदार उत्तर देऊ, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार इस्त्रायलने आपली कारवाई सुरु केली आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. तसेच इराणच्या आण्विक केंद्रावरही क्षेपणास्त्रे पडल्याचे बोलले जात आहे. इराणच्या आण्विक साइटवर तीन क्षेपणास्त्रे पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने आपल्या सर्व लष्करी तळांना हाय अलर्टवर ठेवले आहे. हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारी पहाटे इराणवर हल्ला झाला. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर स्फोटाचा आवाज ऐकू आला. इस्फहान शहरात अनेक अणू प्रकल्प आहेत. इराणचा सर्वात मोठा युरेनियम कार्यक्रमही या ठिकाणा आहे. या हल्लानंतर अनेक उड्डाणे वळवण्यात आली आहेत.
दरम्यान या हल्ल्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, इस्रायलने इराणवर एअर स्ट्राईक केली आहे. त्यामुळे या भागात आणखी संघर्ष वाढू शकतो.
सीरियामधील इराणी दूतावासावर इस्त्रायलने १ एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केली होती. त्यात इराणचे दोन टॉप कमांडरसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा जाहेदी याचा समावेश होता. परंतु इस्त्रायलने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. इराण हमासला मदत करत असल्यामुळे इस्त्रायलने ही कारवाई केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानंतर इराणने इस्त्रायलला बदला घेण्याची धमकी दिली होती. १४ एप्रिल रोजी इराणने इस्त्रायवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याच्या उत्तरात १९ एप्रिल रोजी ही कारवाई इस्त्रायलने इराणवर केली.
हे ही वाचा
इराण की इस्रायल कोणाची पॉवर जास्त, नेतन्याहू म्हणाले, ‘जोरदार उत्तर देणार’