Israel-Hamas War | वेळ बदलली, मैत्री मागे सोडून इस्रायलच एकला चलो रे, अमेरिकेला नाही जुमानणार

| Updated on: Nov 14, 2023 | 11:11 AM

Israel-Hamas War | एका छोट्याशा देशाचा मोठा निर्णय. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाला महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटलाय. आतापर्यंत या युद्धात गाजापट्टीत मोठी जिवीतहानी झालीय. 11 हजारपेक्षा जास्त मृत्यू झालेत.

Israel-Hamas War | वेळ बदलली, मैत्री मागे सोडून इस्रायलच एकला चलो रे, अमेरिकेला नाही जुमानणार
israel-hamas war
Follow us on

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये मागच्या 40 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमध्ये गाजा पट्टी उद्धवस्त झाली आहे. गाजामध्ये आतापर्यंत 11 हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यात 4500 पेक्षा अधिक लहान मुलं आणि 3000 महिला आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसोबकत सर्वसामान्य नागरिकही मारले जातायत. बऱ्याच प्रयत्नानंतरही इस्रायल गाजामध्ये युद्ध विराम करायला तयार नाहीय. इस्रायलने युद्धविरामची घोषणा करावी, यासाठी इस्लामिक देशांचे सतत प्रयत्न सुरु आहेत. पण गाजा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरुच आहेत. इस्रायलने हवाई हल्ल्याबरोबरच जमिनी हल्ले सुद्धा वाढवले आहेत. गाजात आतमध्ये घुसून इस्रायली सैन्य हमासची ठिकाण नष्ट करत आहेत. सर्वात महत्त्वाच म्हणजे अमेरिकेच्या इशाऱ्यावर चालणार इस्रायल आता त्यांच्याकडेच दुर्लक्ष करतोय.

गाजामध्ये सीजफायर करण्याबद्दल इस्रायल काहीही ऐकायला तयार नाहीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी विनंती करुनही इस्रायलने गाजामध्ये हल्ले कमी केलेले नाहीत. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविरामाला नकार दिलाय. इस्रायल हमास विरुद्ध शेवटपर्यंत युद्ध सुरु ठेवेल, असं नेतन्याहू यांनी म्हटलय. गाजा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरुच आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाजा भकास झालं आहे. सगळीकडे उद्धवस्त झाल्याच्या खूणा दिसत आहेत. आतापर्यंत गाजा पट्टीतून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

सरळ, सरळ दुर्लक्ष

इस्रायली सैन्य गाजातील रुग्णालयाला लक्ष्य बनवत आहे. हमास तिथल्या रुग्णालयांचा ढालीसारखा वापर करतय असं आयडीएफने सांगितलं. रुग्णालयात हमासच्या दहशतवाद्यांनी कमांड सेंटर उघडलय. त्यामुळे इस्रायली सैन्याने रुग्णालयाकडे मोर्चा वळवलाय. गाजातील हल्ले इस्रायलने थांबवावेत यासाठी अरब आणि इस्लामिक देश अमेरिकेवर दबाव टाकतायत. पण इस्रायल अमेरिकेच ऐकायला तयार नाहीय. इस्रायलने गाजामध्ये मदत पोहोचू द्यावी व हल्ले थांबवावेत अशी विनंती ब्लिंकन यांनी केली होती. पण इस्रायली पंतप्रधानांनी ही मागणी फेटाळून लावली होती. बंधकांना सोडल्याशिवाय कुठलाही युद्धविराम नाही अशी इस्रायलची भूमिका आहे. काहीकाळापुरता युद्ध थांबवाव यावरही अमेरिका आणि इस्रायलमध्ये एकमत झालं नाही.