Israel-Palestine conflict: दारावर दहशतवादी, रस्त्यावर मृतदेहांचा खच, इस्राईलमधील भयावह परिस्थिती

| Updated on: Oct 08, 2023 | 9:36 AM

Israel-Palestine conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये अचानक घुसखोरी करणाऱ्या हमासच्या विरुद्धच्या युद्धाला वेळ लागेल असे म्हटले आहे. हमासचे दहशतवादी इस्राईली लोकांना टार्गेट करत आहेत. इस्राईली सैन्याकडून हमासच्या दहशतवाद्यांना शोध सुरु आहे.

Israel-Palestine conflict: दारावर दहशतवादी, रस्त्यावर मृतदेहांचा खच, इस्राईलमधील भयावह परिस्थिती
Follow us on

तेल अवीव : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्राईलवर अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये युद्ध सुरु झाले आहे. इस्रायलने देखील युद्धाची घोषणा केली आहे. हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायली लष्कर ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स चालवत आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 300 हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर 1600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्राईलमधील परिस्थिती भयावह आहे. दहशतवादी लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसत होते. इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमध्ये 230 लोक ठार झाल्याची माहिती आहे.

इस्रायली लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रॉकेट सायरन Sderot आणि Kibutz Nir Am सारख्या भागात वाजले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही.

इस्रायली हवाई दलाकडून गाझावर बॉम्बहल्ला

रविवारी इस्राईलने गाझावर हल्ला सुरू केलाय. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात सुमारे 230 लोक मारले गेले आहेत. तर 1,700 लोक जखमी झाले आहेत.

गाझावर इस्त्रायलकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू आहेत. गाझा शहकरात दाट लोकवस्ती आहे. इस्रायल सरकारने गाझा पट्टीचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

हमासला इराण आणि पाकिस्तानचा पाठिंबा

हमासला इराण आणि पाकिस्तानचा पाठिंबा मिळत आहे. इस्रायलवरील हल्ला पॅलेस्टिनींनी स्वसंरक्षणार्थ केल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इराणने मुस्लीम देशांना पॅलेस्टिनींच्या हक्काचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. इराणमध्ये उत्सव साजरा करण्यात आला, हमासने या कारवाईला “गौरवपूर्ण ऑपरेशन” म्हटले आहे.