जेरुसलेम : इस्रायल-हमास युद्धात गाझा पट्टी उद्धवस्त झाली आहे. गाझामधून लाखो लोकांनी पलायन सुरु केलं आहे. युनायटेड नेशनसह आंतरराष्ट्रीय संस्थांनी इस्रायलच्या आदेशावर टीका केलीय. इस्रायली सैन्याने जमिनी कारवाई सुरु केलीय. इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने पलायन करणाऱ्या पॅलेस्टिनींवर इस्रायलने एअर स्ट्राइक केला. यात 70 लोक मारले गेलेत. या एअर स्ट्राइकमध्ये एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. इस्रायलच्या या कारवाई विरोधात काही देशांनी आवाज उठवलाय. इस्रायलने हे हल्ले थांबवावेत, असा कतारने इशारा दिलाय. रशियाने हमासच्या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलय. इराण आणि सौदी अरेबियात पॅलेस्टाइनच्या स्थितीबद्दल अनेक वर्षानंतर चर्चा झाली. खाडी देश इस्रायलला रोखण्यासाठी प्लानिंग करत आहेत. मिडल इस्टपासून आशिया, युरोप आणि अमेरिकेपर्यंत पॅलेस्टाइनच्या समर्थनात प्रदर्शन होत आहे.
1 इस्रायली सैन्याने गाझाच्या उत्तरेकडे राहणाऱ्या 11 लाख लोकांना गाझा सोडण्यास सांगितलय. त्यांना 24 तासात संपूर्ण भाग रिकामी करण्याचा आदेश दिलाय. जीव वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येने लोकांनी पलायन सुरु केलं आहे. असंच घर सोडून निघालेल्या लोकांवर इस्रायली सैन्याने एअर स्ट्राइक केला. त्यात 70 नागरिकांचा मृत्यू झाला.
2 इस्रायलच्या एअर स्ट्राइकमुळे आतापर्यंत गाजामध्ये 1530 नागरिकांचा मृत्यू झाला. 6500 हजार नागरीक जखमी आहेत. इस्रायलमध्ये आतापर्यंत 1400 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय.
3 लाखो लोकांना गाझा सोडून निघून जा, सांगण्याच्या इस्रायलच्या आदेशावर संयुक्त राष्ट्राने नाराजी व्यक्त केली आहे. यूएन चीफ एंटोनियो गुटेरेस यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करा अस आवाहन केलं आहे.
4 इस्रायलने जमिनी कारवाई सुरु केली आहे. इस्रायली सैन्याने गाझापट्टीत प्रवेश केलाय. बंधकांचे मृतदेह मिळाल्याचा इस्रायली सैन्याचा दावा आहे.
5 एकाबाजूला हमास बरोबर लढताना इस्रायली सैन्याने लेबनॉनवर सुद्धा स्ट्राइक केलाय. दक्षिण लेबनॉनच्या एका स्ट्राइकमध्ये रॉयटर्सच्या व्हिडिओ पत्रकाराचा मृत्यू झाला. सहा अन्य पत्रकार जखमी झाले. ते इस्रायली सीमेवर होते. लेबनॉनच्या सीमेवर इस्रायली सैन्य आणि हेजबोला यांच्यात युद्ध सुरु आहे.