Israel Attack Iran : आधी इराणला आंधळं केलं, मग हल्ला केला, म्हणजे नेमकं इस्रायलने काय केलं?

| Updated on: Oct 26, 2024 | 12:33 PM

Israel Attack Iran : इस्रायलने शनिवारी मध्यरात्री इराणवर भीषण हल्ला चढवला. इस्रायलने पूर्णपणे प्लानिंग करुन इराणवर हा हल्ला केला. असा हल्ला करण्याआधी इस्रायलने इराणला पूर्णपणे आंधळ केलं. इस्रायलने हा हल्ला करण्याआधी नेमकं काय केलं? कशी प्लानिंग होती? जाणून घ्या.

Israel Attack Iran : आधी इराणला आंधळं केलं, मग हल्ला केला, म्हणजे नेमकं इस्रायलने काय केलं?
Israel Attack Iran
Follow us on

इस्रायलने इराणला आज दणका दिला. बरोबर 25 दिवसांनी इस्रायलने इराण बरोबरचा हिशोब चुकता केला. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीववर हल्ला करण्याच धाडस केलं होतं. 1 ऑक्टोंबरला इराणने हा हल्ला केला होता. त्यात इस्रायलच नुकसान झालं होतं. या वर्षात इराणने इस्रायलवर दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला केला. याआधी एप्रिल महिन्यात इराणने थेट इस्रायलवर अशाच प्रकारचा मिसाइल हल्ला केला होता. दुसऱ्या हल्ल्यानंतर इराणला प्रत्युत्तर देणार, इराणला धडा शिकवणार असा संकल्पच इस्रायलने केला होता. हल्ल्याच ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू, असं इस्रायलने म्हटलेलं. त्यानुसार इस्रायलने काल कारवाई केली. रात्री 2.30 च्या सुमारास 2000 किलोमीटरचा प्रवास करुन इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. तेहरान आणि कराजच्या चार शहरात 10 पेक्षा जास्त ठिकाणी बॉम्ब वर्षाव झाला. यात त्यांचं मोठ नुकसान झालय.

इस्रायलने इराणमध्ये घुसण्याआधी सीरियामध्ये हल्ला केला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सीरियावर हल्ला का?. सीरियामध्ये इराणने पोसलेले दहशतवादी गट आहेतच, पण सीरियामध्ये रडार यंत्रणा आहे. त्याद्वारे इराणला इस्रायलच्या हल्ल्याची माहिती मिळाली असती. म्हणून इस्रायली फायटर जेट्सनी सीरियामधील रडार यंत्रणा उद्धवस्त केली. इस्रायली मीडियानुसार इराण विरुद्ध इस्रायली हल्ला तीन टप्प्यात करण्यात आला. आधी इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला टार्गेट केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिसाइल आणि ड्रोन ठिकाणांना लक्ष्य केलं. रडार आणि एअर डिफेन्स सिस्टिमवरील हल्ल्यामुळे इराणला इस्रायलचा हल्ला रोखता आला नाही तसच त्यांना इस्रायली हल्ल्याची तीव्रता सुद्धा लक्षात आली नाही. म्हणजे इराणला आधी आंधळ करुन मग इस्रायलने हल्ला चढवला.

इराणच्या न्यूक्लियर साइटवर का हल्ला केला नाही?

इस्रायलने या हल्ल्यासाठी 100 फायटर जेट्सचा वापर केला. यात सर्वात घातक F-35 फायटर जेट सुद्धा होतं. इस्रायलला या हल्ल्यात इराणची न्यूक्लियर साइट आणि ऑईल विहिरी नष्ट करता आल्या असत्या. पण तणाव आणखी भडकू नये, यासाठी इस्रायलने फक्त इराणच्या लष्करी क्षमतेला टार्गेट केलं. लष्करी केंद्रांच नुकसान केलं.