मागील आठवड्यात इस्त्रायलवर इराणने सरळ हल्ला केला होता. त्यानंतर आधीच अशांत असलेल्या मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. आता इस्रायलने बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. इस्त्रायल इराणवर कधीही मोठा हल्ला करू शकतो. इस्रायल इराणच्या तेल केंद्रांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे अमेरिका परिस्थिती निवाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. आता इस्त्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी ईराणवर घातक हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले इराणवरील हल्ला हा घातक, अचूक आणि आश्चर्यकारक असणार आहे.
जो बायडेन आणि नेतन्याहू यांच्यात ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदा चर्चा झाली. आता इस्त्रायलसोबत ईराण अन् हिजबुल्लाह यांच्यातील युद्धाची तीव्रता वाढली आहे. तसेच दोन्ही देशांकडून माघारीचे कोणतेही संकेत नाही. बायडेन आणि नेतन्याहू यांच्यात चर्चा झाली तेव्हा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस त्या ठिकाणी होत्या. मागील काही दिवसांपासून बायडेन आणि नेतन्याहू यांच्यातील संबंधसुद्धा तणावाचे बनल्याची चर्चा आहे.
इस्रायलने गाझामधील युद्ध ज्या पद्धतीने हाताळले आहे आणि हमास, हिजबुल्लाहशी संघर्ष सुरु आहे, त्यामुळे तणाव वाढला आहे. पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी त्यांच्या पुस्तकात याबाबत उल्लेख केला आहे. त्यांनी एका अहवालाचा आधार देत म्हटले आहे की, जुलैमध्ये बेरूतजवळ आणि इराणमध्ये इस्त्रायली हल्ल्यांनंतर बायडेन यांनी नेतन्याहूवर कोणतीही रणनीती नसल्याचा आरोप केला. तसेच ते संतापलेसुद्धा होते.
इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होतो. तो अयशस्वी ठरल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री गॅलंट यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले की, “जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याला खूप दुखापत होईल आणि त्याला किंमत मोजावी लागेल. आमचा हल्ला प्राणघातक आणि अचूक असेल. ते इराणसाठी धक्कादायक असणार आहे. इराणला काय झाले ते समजणार नाही, ते फक्त विनाश पाहतील.