Israel Hamas War : गाजापट्टी इस्रायलच्या टप्प्यात, कोणत्याही क्षणी ग्राऊंड अटॅक; सैन्य फक्त 5 किलोमीटरवर

| Updated on: Oct 23, 2023 | 11:27 AM

हमास आणि इस्रायलचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. इस्रायलच्या सैन्याने गाजापट्टीच्या सीमेवर तळ ठोकला आहे. कोणत्याही क्षणी गाजापट्टीवर ग्राऊंड अटॅक करण्याची तयारी इस्रायलने पूर्ण केली आहे.

Israel Hamas War : गाजापट्टी इस्रायलच्या टप्प्यात, कोणत्याही क्षणी ग्राऊंड अटॅक; सैन्य फक्त 5 किलोमीटरवर
israeli army
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

तेल अविव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सांगली | 23 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यानचं युद्ध आता निर्णयाक टप्प्यावर आलं आहे. हमासने 17 दिवस झुंजायला लावल्यानंतर आता इस्रायल मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. गाजापट्टीवर ग्राऊंड अटॅक करण्यासाठी इस्रायल सज्ज झाला आहे. इस्रायलने सर्व जुळवाजुळव केली आहे. गाजापट्टीपासून 5 किलोमीटर अंतरावर सैन्य तैनात केलं आहे. फक्त एका आदेशाची वाट आहे. आदेश येताच एखाद्या वादळा सारखं हे सैन्य गाजापट्टीत घुसेल आणि हमासच्या अतिरेक्यांचा खात्मा करणार आहे.

युद्धाच्या 17व्या दिवशीही गाजापट्टीत जोरदार बॉम्ब वर्षाव सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाजापट्टीतील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. एवढेच नव्हे तर एअर स्ट्राईकमध्ये आतापर्यंत 4600 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हवेतून हल्ला केल्यानंतर आता इस्रायल ग्राऊंड अटॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणत्याही क्षणी गाजापट्टीवर हा हल्ला केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे डोळे गाजापट्टीकडे लागले आहेत.

नागरिकांना गाजपट्टी सोडण्याचे आदेश

हमासचे अतिरेकी गाजापट्टीतील भुयार आणि तळघरांमध्ये लपले आहेत. त्यामुळे या अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी ग्राऊंड ऑपरेशनची गरज आहे. त्यामुळेच गाजापट्टीतील लोकांना शहर सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. ग्राऊंड अॅक्शन घेताना या नागरिकांना काही होऊ नये म्हणून हे आदेश दिले आहेत. तर इस्रायलच्या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष करा, असं हमासच्या अतिरेक्यांकडून गाजातील नागरिकांना सांगितलं जात आहे.

चारही सीमांना घेरलं

इस्रायलच्या लष्कराने गेल्या काही दिवसांपासून गाजाच्या सर्व सीमांना घेरलं आहे. फक्त इस्रायलच्या सरकारच्या आदेशाची हे सैन्य वाट पाहत आहे. सरकारचा आदेश येताच गाजापट्टीत शिरून हल्ले करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायली सैनिकांना कोणत्याही क्षणी हल्ल्याचे आदेश मिळणार आहेत. त्यामुळेच गाजापट्टीत ग्राऊंड अटॅकची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी हल्ले, तिथेच सैन्य तळ

चीनी मीडिया ग्रुपच्या दोन पत्रकारांना रविवारी किबुत्ज बेरीमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. किबुज्ज बेरी गाजापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा परिसर इस्रायली सैन्याच्या नियंत्रणातील आहे. या ठिकाणी इस्रायली सैना लाइव्ह फायर ड्रिल करत आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या ज्या भागात पहिल्यांदा हल्ले केले होते. त्यापैकी किबुत्ज बेरी हे एक आहे. या गावातील हल्ल्यानंतर इस्रायलच्या लष्कराने आपलं तळ बदललं होतं. त्यानंतर आता पुन्हा किबुत्ज बेरीत मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आलं आहे. गाजावर ग्राऊंड अटॅक करण्यासाठीच ही तयारी करण्यात आली आहे.