इस्त्रायली नौदलाने आज उत्तर लेबनॉनमधील शहर बॅट्रॉनमध्ये केलेल्या कारवाईत हिजबुल्लाच्या एका मोठा कमांडर ताब्यात घेतला आहे. हा हिजबुल्लाच्या नौदल दलातील सर्वोच्च अधिकाऱ्यांपैकी एक आहे. इस्त्रायलने त्याला ताब्यात घेतल्याने हे इस्रायलसाठी मोठे यश मानले जात आहे. यामुळे समुद्रात हिजबुल्लाचा कणा मोडला आहे. नौदल सामर्थ्याच्या बाबतीत हिजबुल्ला इस्रायलच्या आधीच खूप मागे होता. अरब मीडिया अल-हदाथच्या वृत्तानुसार, पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव इमाद फदल अम्हाज असून तो हिजबुल्लाचा वरिष्ठ सदस्य आहे. हा लेबनीज नौदलाचा भाग असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
इस्त्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, हिजबुल्लाहच्या नौदलाच्या कारवायांबाबत चौकशी करण्यासाठी अम्हाजला अटक करण्यात आली होती. इस्त्रायली माध्यमांनी लेबनीज अधिकाऱ्यांच्या दाव्यांचा हवाला देत वृत्त दिले की युनिफिलचा एक भाग म्हणून कार्यरत जर्मन नौदल दलाच्या समन्वयाने ही कारवाई कथितपणे करण्यात आली.
या कारवाईत २५ हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचे KAN ने अहवालात म्हटले आहे. IDF सैनिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळील केबिनमध्ये प्रवेश केला आणि तेथे एकटा राहणाऱ्या अम्हाजचे अपहरण केले. लेबनीज मीडिया N12 ने वृत्त दिले आहे की लेबनीज सुरक्षा दल या घटनेची चौकशी करत आहेत. प्रो-हिजबुल्लाह पत्रकार हसन इलाक यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले की, इस्रायली सैनिकांचा एक मोठा गट रिसॉर्ट शहरात उतरला आणि स्पीड बोटीतून निघण्यापूर्वी त्या व्यक्तीला पकडले.
דיווח בלבנון: “כוח של צה”ל פעל בצפון המדינה ולקח בשבי איש חיזבאללה” | תיעוד @OmerShahar123
צילום: שימוש לפי סעיף 27 א’ pic.twitter.com/9IJsld3mhT— כאן חדשות (@kann_news) November 2, 2024
इस्रायलच्या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. ज्यामध्ये सैनिक रस्त्यावरून चालताना दिसत आहेत, त्यापैकी दोघांनी एका माणसाला धरले आहे. लेबनॉनच्या सरकारमध्ये हिजबुल्लाचे प्रतिनिधित्व करणारे लेबनीज वाहतूक मंत्री अली हमीये म्हणाले की व्हिडिओ बरोबर आहे, परंतु अधिक माहिती दिलेली नाही. लेबनीज शहर इस्रायली किनाऱ्यापासून सुमारे 140 किलोमीटर आणि बेरूतच्या उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावर आहे.