इटलीच्या अपुलियामध्ये G7 देशांची बैठक सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी सध्या इटलीमध्ये आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. पीएम मोदींच्या या इटली दौऱ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भारतात सुद्धा लोकप्रियता वाढली आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पीएम नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही नेते राजकारणात शुन्यातून सुरुवात करुन सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. दोघेही आपआपल्या देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे दोघांच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
G7 परिषदेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी काढला. मोदी G7 परिषदेसाठी पोहोचले, तेव्हा जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय परंपरेनुसार ‘नमस्ते’ करुन त्यांचं स्वागत केलं. यावेळी दोघांचेही चेहरे प्रसन्न, आनंदी होते. 9 जूनला पीएम मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर इटली हा त्यांचा पहिला अधिकृत परदेश दौरा आहे. मोदी G7 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नोलॉजीची एकाधिकारशाही संपवण्यावर बोलले. तंत्रज्ञानाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. ही फक्त आपली इच्छा नाही, जबाबदारी असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं.
PM Narendra Modi and Italy’s PM Giorgia Meloni’s selfie on the sidelines of the G7 summit, in Italy. pic.twitter.com/wE1ihPHzeq
— ANI (@ANI) June 15, 2024
G7 मध्ये किती देश?
G7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, ब्रिटिश पीएम सुनक, युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की, जापानचे पीएम फ्युमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत G7 परिषदेत अतिथी देश म्हणून सहभागी होतो. भारताला G7 परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळण्याची ही 11वी वेळ आहे. G7 मध्ये अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपानचा समावेश आहे. यंदा इटलीकडे G7 चे अध्यक्षपद आहे.