Japan earthquake | जापान वगळता जगातील सर्वच देशांसाठी नव्या वर्षाचा पहिला दिवस आनंदमय, उत्साहवर्धक होता. जापानसाठी नव्या वर्षाची सुरुवात अपेक्षित झालेली नाही. जापानी नागरिक चिंतेमध्ये आहेत. काल जापानची भूमी एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. आपण कल्पनाही करणार नाही, इतके प्रचंड भूकंपाचे धक्के जापानमध्ये जाणवले. जापानची भूमी 7 तासात तब्बल 60 भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. जापानमध्ये अजूनही त्सुनामीचा धोका कायम आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. आतापर्यंत 6 नागरिकांचा मृत्यू झालाय. जवळपास 1 लाख नागरिकांना किनारपट्टी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना घरी परतू नका, असं प्रशासनाने सांगितलं आहे. कारण समुद्रात तुफानी लाटा उसळण्याचा धोका कायम आहे. भूकंपाचा सर्वात मोठा धक्का 7.6 रिश्टर स्केलचा होता. त्यामुळे जापानच मुख्य द्वीप होशू पश्चिम किनाऱ्यावर आग लागली. इमारती कोसळल्या. जापानच्या हवामान विभाग एजन्सीने स्थानिकवेळेनुसार, सोमवारी संध्याकाळी 4 नंतर इशिकावा किनारा आणि आसपासच्या प्रांतात भूकंपाचे मोठे धक्के जाणवतील, याची सूचना दिली.
किती हजार घरांमध्ये लाईट गेली?
भूकंपामुळे सहा घरांच नुकसान झालं असं सरकारचे प्रवक्ते योशिमासा हयाशी यांनी सांगितलं. इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात भूकंपामुळे आग लागली आणि 30 हजार पेक्षा जास्त घरांमध्ये वीजप्रवाह खंडीत झाला.
कुठल्या प्रांतासाठी मोठ्या त्सुनामीचा इशारा?
हवामान विज्ञान संस्थेने सुरुवातीला इशिकावा प्रांतासाठी मोठ्या त्सुनामीचा इशारा दिला. होंशूच्या पश्चिम किनारपट्टीसह उत्तरी मुख्य द्वीप होक्काइडोसाठी त्सुनामीचा इशारा दिला. ‘लोकांनी किनारपट्टीपासून लांब गेलं पाहिजे’ असं हयाशी यांनी जोर देऊन सांगितलं. प्रत्येक मिनिट महत्त्वाच असून त्यामुळे लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा.
नियमित त्सुनामीचा इशारा म्हणजे काय?
काही तासांनी इशारा नियमित त्सुनामीमध्ये बदलण्यात आला. याचा अर्थ असा आहे की, समुद्रात अजूनही 3 मीटर (10 फूट) पर्यंत लाटा उसळू शकतात. एजेंसीने सांगितलं की, पुढच्या काही दिवसात त्या क्षेत्रात ऑफ्टरशॉक येऊ शकतो. जापानी सार्वजनिक प्रसारक एनएचके टीवीने सुरुवातीला सांगितलेल की, पाण्याची धार 5 मीटर (16.5 फूट) पर्यंत जाऊ शकते. नेटवर्कने काही तासांनी सुद्धा इशारा कायम ठेवला. कारण भूकंपानंतर झटके जाणवत होते. लोकांची व्यवस्था स्टेडियममध्ये करण्यात आलीय. तिथे त्यांना काही दिवस रहाव लागू शकतं.