टोकियो – जगातील मात्तबर देशांमध्ये अंतराळावर (Space)कब्जा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. अंतराळात सर्वात पहिल्यांदा कोणता देश विस्तार करेल, त्यांचं पाऊल तिथे रोवलं जाईल,याची स्पर्धा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कुणी चंद्रावर (moon)बेस तयार करण्याच्या विचारात आहेत. तर कुणी मंगळावर (mars)कॉलनी वसवण्याच्या विचारात आहे. यातच काजिमा कन्स्ट्रक्शनच्या मदतीने जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधक कृत्रिम अंतराळ शहर वसवण्याच्या तयारीत आहेत. इतकंच नाही तर पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांना जोडणारी इंटर प्लेनेटरी ट्रेन निर्माण करण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. वैज्ञानिक आता केवळ अंतराळात जाण्याचा विचारच करत नाहीयेत, तर त्या ठिकाणी नवं जग स्थापन करण्याच्या विचारात ते दिसतायेत.
— Benjamin O’Farrell (@bwofarrell) July 15, 2022
या संशोधकांच्या टीमने एक पत्रकार परिषद घेत, ते अंतराळात शहर वसवण्यासाठी काय करणार आहेत, याची माहिती दिली आहे. एक काचेचं स्ट्रक्चर यासाठी विकसीत करण्यात येणार आहे. यात शून्य आणि कमी गुरुत्वाकर्षणात मानवीय शरिर कसे सुरक्षित राहब शकेल आणि माणसाची शक्ती कशी कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या काचेच्या स्ट्रक्चरमध्ये पृथ्वीसारखे गुरुत्वाकर्षण आणि वातावरण असेल अशीही माहिती देण्यात आली आहे. अंतराळात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशिवाय राहणे अवघड असते. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर राहण्याचे अनेक धोकेही असतात. खासकरुन अंतराळात मुलांना जन्म देणे अधिक जटिल असल्याचेही सांगण्यात येते. अंतराळात जन्माला येण्याचा प्रभाव नव्या मुलावरही होण्याचा धोका असतो. याचा सविस्तर अभ्यास अद्याप झाला नसला तरी अंतराळात जन्माला येणारे मूल पृथ्वीवर आल्यास त्याला आपल्या पायांवर उभे राहता येत नाही, असे सांगण्यात येते.
कृत्रिम गुरुत्वाकर्षण असलेल्या या काचेच्या शंकाच्या आकाराच्या शहरात सार्वजनिक वाहतूक, हिरवे गलत, पाणी व्यवस्था यासारख्या पृथ्वीवरील व्यवस्था उपलब्ध असतील. या पत्रकार परिषदेत याचे कॉम्प्युटर मॉडेल दाखवण्यात आले. त्यात अंतराळातील शहरात नद्या, पाणी आणि मानवासाठी उद्याने यांच्या सोयी असतील असे यात दाखवण्यात आले आहे
या शहराच्या मॉडेलचा आकार उलट कोनासारखा असेल. याची उंची १३०० फूट आणि रुंदी ३२८ फूट असेल. २०५० पर्यंत हे मॉडेल तयार होईल असा संशोधकांना विश्वास आहे. या संशोधकांची इंटरप्लॅनेटरी वाहतूक व्यवस्था उभारण्याचेही स्वप्न आहे. ज्याला हैक्साट्रेक म्हणटले जाते. यातून कमी गुरुत्वाकर्षण असलेल्या भागात दूर अंतरावर जाण्यासाठी यात्रेच्या काळात १ जी गुरुत्वाकर्षण शाबूत ठेवेल.
पृथ्वी आणि चंद्रामध्ये एक छोटी मिनी कॅप्स्युल धावेल. हैक्साकॅप्स्युल हेक्सागोनल आकाराची ही कॅप्स्युल असेल. याची त्रिज्या १५ मीटरची असेल. तर मंगळ आणि चंद्रामध्ये प्रवास करणारी कॅप्स्युल यापेक्षा मोठी (३० मीटर त्रिज्येची) असेल. पृथ्वीवर याचे स्टेशन असेल त्याला टेरा स्टेशन म्हणण्यात येईल. सहा डब्ब्य़ांच्या गेज ट्रॅकवर चालणाऱ्या या ट्रेनला स्पेस एक्सप्रेस म्हटले जाईल.