होय, आमचे शारीरिक संबंध होते; गर्लफ्रेंडच्या गौप्यस्फोटाने ब्रिटीश पंतप्रधानांची चौकशी सुरू

| Updated on: Mar 30, 2021 | 4:18 PM

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या एका भलत्याच वादात अडकले आहेत. (Jennifer Arcuri and Boris Johnson 'had sex at his family home while wife was away')

होय, आमचे शारीरिक संबंध होते; गर्लफ्रेंडच्या गौप्यस्फोटाने ब्रिटीश पंतप्रधानांची चौकशी सुरू
boris johnson
Follow us on

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या एका भलत्याच वादात अडकले आहेत. त्यांची पूर्वीची गर्लफ्रेंड आणि उद्योगजिका जेनिफर अर्करी हिने जॉन्सन यांच्याबाबतचा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान जॉन्सन यांच्यासोबत आपले शारीरिक संबंध आले होते, असं जेनिफरने म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर तिने त्यांच्या दोघांचा एक सेक्सी फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये वादळ उठलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जॉन्सन यांच्या सोबतचं प्रेमप्रकरण चार वर्षे सुरू होतं, असंही तिने म्हटलं आहे. (Jennifer Arcuri and Boris Johnson ‘had sex at his family home while wife was away’)

जेनिफर ही जॉन्सन यांच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. त्याकाळात पंतप्रधानांची पत्नी मरिना घरी नसताना आमचे संबंध आले होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये एकत्र शय्यासोबत करायचो. या फ्लॅटमध्ये पोल डान्सरसाठी पोलही बनवलेला होता. जेव्हा आम्ही प्रेमात आकंठ बुडालेलो होतो, तेव्हा आठवड्यातून एकदा तरी भेटायचोच, असं जेनिफरने सांगितलं. बोरिस जॉन्सन यांना मी माझा टॉपलेस फोटोही पाठवला होता, असं सांगतानाच मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. ते मला खूप आवडतात, असंही तिने सांगितलं.

2012 ते 2016 पर्यंत प्रेमप्रकरण

आम्हा दोघांमध्ये शारीरिक आणि बौद्धिक आकर्षण होते. बोरिस माझं शरीर आणि बुद्धी दोन्हीवर प्रेम करायचे. त्यावेळी ते लंडनचे मेयर होते. आणि आमचं प्रेमप्रकरण 2012 ते 2016 पर्यंत सुरू होतं, असं तिने सांगितलं. जेनिफर आणि जॉन्सन जेव्हा करदात्यांच्या पैशांनी ट्रेड मिशनवर गेले होते तेव्हा या दोघांच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले गेले. त्यांच्या या दौऱ्यावरून या दोघांमध्ये नातेसंबंध होते हे उघड झाले आहे. मात्र, या दोघांनी त्याबाबत कबुली देण्यात आली नव्हती.

तसं प्रेम राहिलं नाही

2016 मध्ये मी जॉन्सन यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते. मात्र, तसंच प्रेम आता राहिलं नाही, असंही तिने सांगितलं. तसेच त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्साही तिने सांगितला. एका रेस्टॉरंटमध्ये जॉन्सन दारू प्यायले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यासी डेटिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांच्या फ्लॅटवर संबंध ठेवले होते, असंही तिने स्पष्ट केलं. (Jennifer Arcuri and Boris Johnson ‘had sex at his family home while wife was away’)

 

संबंधित बातम्या:

दोन्ही पाय एक हात नसतानाही बास्केटबॉल खेळतो, जिममध्ये वेट लिफ्टिंग, जगाला प्रेरणा देणारी ही व्यक्ती कोण?

बॉयफ्रेंडची हत्या केल्याने तरुणीला जन्मठेपेची शिक्षा, मात्र ‘या’ कारणामुळे शेकडो महिला समर्थनासाठी रस्त्यावर

सौदी अरबमध्ये पुरुषांवर ‘या’ 4 देशांमधील महिलांशी लग्न करण्यास निर्बंध, पाकिस्तानसह कोणत्या देशांचा समावेश?

(Jennifer Arcuri and Boris Johnson ‘had sex at his family home while wife was away’)