भारताच्या सामर्थ्याला विदेशात राहून आव्हान देण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत असतो. आता खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याने भारताविरोधात गरळ ओकली आहे. कॅनडामधील त्याने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाचे उपपरराष्ट्र मंत्री डेव्हीड मॉरिसन यांनी भारतसंदर्भात वक्तव्य दिले होते. त्यांनी म्हटले होते, भारत हा एक देश आहे. त्यांच्या अखंडतेचा अन् संप्रभुतेचा सन्मान केला जावा. त्यानंतर पन्नूने एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात भारतातील राज्यांना भारतापासून वेगळे करण्यासाठी मोहिमा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढे जाऊन त्याने चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे. अरुणाचल प्रदेशावर हल्ला करण्याची हीच योग्य वेळ असे म्हणत त्याने आपल्या अकलेचे तारे तोडले आहे.
‘सिख फॉर जस्टिस’ ही संघटना पंजाबला भारतापासून वेगळे करुन खलिस्तानच्या निर्मितीची मागणी करत आहे. त्या संघटनेच्या या मागणीला पंजाबमधूनसुद्धा एकाही व्यक्तीचे समर्थन नाही. गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये राहतो. तो वकिलीचा व्यवसाय करत आहे. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीर, आसम, मणिपूर आणइ नागालँडच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन चालवण्याची धमकी दिली आहे.
खलिस्तानी अतिरेकी पन्नू याने आपल्या व्हिडिओत चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे. तो राष्ट्रपती शी जिनपिंग यांना म्हणतो, जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला अरुणाचल प्रदेशावर आक्रमण करण्याचे आदेश द्यावे. अरुणाचल हा चीनचा भाग आहे. माझे भारताच्या संप्रभुते आव्हान देण्याचे काम सुरुच राहणार आहे. त्या पन्नू या व्हिडिओला एक पोस्टर लावून त्यावर ‘2047 नन इंडिया’ असे लिहिले आहे.
दरम्यान, कॅनडाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅनटाने म्हटले आहे की, दहशतवादी पन्नू आता चीनचा पाठिंबा शोधत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना उद्देशून तो म्हणाले, ‘चीनी सैन्याला अरुणाचल प्रदेश परत घेण्याचे आदेश देण्याची आता वेळ आली आहे.’