India vs Canada | ट्रूडोंच्या राज्यात खलिस्तान्यांची गुंडगिरी, भारत विरोधी प्रदर्शनात काढल्या तलवारी VIDEO

| Updated on: Mar 13, 2024 | 3:11 PM

India vs Canada | मागच्यावर्षीपासून भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. याच कारण आहे, कॅनडात भारतविरोधी चालणाऱ्या कारवाया. ट्रूडो यांच्या कार्यकाळात कॅनडामध्ये खुलेआम खलिस्तान समर्थक भारतविरोधी गरळ ओकत असतात. आता त्यांनी भारतीय राजदूताला विरोध करताना तलवारी, भाले काढले.

India vs Canada | ट्रूडोंच्या राज्यात खलिस्तान्यांची गुंडगिरी, भारत विरोधी प्रदर्शनात काढल्या तलवारी VIDEO
In Canada Protest Against India
Follow us on

India vs Canada | कॅनडात खलिस्तान्यांनी वेळोवेळी आपल उपद्रव मुल्य दाखवून दिलय. आता त्यांनी पुन्हा एकदा तसच वर्तन केलय. जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात कॅनडामध्ये खलिस्तान्यांसाठी मोकळ रान आहे. भारतीय राजदूत संजय कुमार वर्मा यांच्याविरोधात खलिस्तान्यांनी निदर्शन केली. यावेळी त्यांनी हिंसक विरोध प्रदर्शन केलं. अल्बर्टाच्या एडमोंटनमध्ये हे घडलं. खलिस्तान्यांनी संजय कुमार वर्मा यांच्याविरोधात प्रदर्शन करताना तलवारी आणि भाल्याचा वापर केला. त्यांनी हिंसक होण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या कॅनडाच्या पोलिसांनी त्यांचा प्रोपेगेंडा चालू दिला नाही. काही खलिस्तानी थेट पोलिसांना भिडले.

संजय कुमार वर्मा एडमोंटन येथे बिजनेस लीडर सोबत चर्चा करत होते. इंडो-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सने (आयसीसीसी) या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. सिख फॉर जस्टिसने (एसएफजे) हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. खलिस्तान समर्थकांनी कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असं संजय वर्मा म्हणाले. खलिस्तानी त्यांच्या योजनेत यशस्वी होऊ शकले नाहीत. आयोजन स्थळाबाहेर आंदोलकांची संख्या 80 च्या घरात होती.

सिक्योरिटी गार्डची गरज लागली

राजदूताच्या सुरक्षेची जबाबदारी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांवर होती. धोका लक्षात घेऊन पोलिसांनी एडमोंटन पोलिसांसोबत मिळून आंदोलकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापासून रोखलं. सिक्योरिटी गार्ड संजय वर्मा यांना सुरक्षेमध्ये कार्यक्रम स्थळी घेऊन गेले.


गुरपतवंत पन्नूने काय म्हटलय?

असाच प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आला होता. 2 मार्चला ब्रिटिश कोलंबिया शहराच्या सरे बोर्ड ऑफ ट्रेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्त सहभागी झाले होते. संजय वर्मा यांना टार्गेट करण्याचा खालिस्तान समर्थक प्रयत्न असाच सुरु ठेवतील असं एसएफजेच्या गुरपतवंत पन्नूने म्हटलं आहे.