मुंबई : माजी किक बॉक्सर म्हणून ओळख असलेला अँड्यू टेट हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. सोशल मीडियावर अँड्यू महिलांविषयी कायमच वादग्रस्त वक्तव्य करत आग ओकतो. यामुळेच फेसबुक आणि इंस्टाग्रामने अँड्यू टेट याला बॅन केले. एका रिअॅलिटी शोमध्ये महिलांबद्दल अत्यंत चुकीचे वक्तव्य केल्यामुळे अँड्यू याला शोने बाहेरचा रस्ता दाखवला होता. अँड्यू टेट आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेले आहे.
अँड्यू टेट यावेळी थोड्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलाय. अँड्यू टेट याने चक्क ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम स्विकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून अँड्यू टेटचा मजिदमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, त्यावेळीच अनेकांनी अँड्यू टेट याने इस्लाम धर्म स्विकारल्या असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र, आता स्वत: अँड्यू टेटने यावर खुलासा केलाय.
My brother – MashAllah pic.twitter.com/TF5trRYR07
— Tam Khan (@Tam_Khan) October 24, 2022
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यामध्ये हॉलिवूड अभिनेता टॅम खान मशिदीत नमाज पढताना दिसत आहे. टॅम खान अँड्यू टेट याला नमाज शिकवताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, यावेळी अँड्यू टेट याने इस्लाम धर्म स्विकारला आहे. अँड्यू टेटचे म्हणणे आहे की चांगल्या गोष्टींवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी इस्लाम स्विकारला पाहिजे.
अमेरिकेच्या शिकागो शहरात अँड्यू टेटचा जन्म झालाय. मात्र, त्याचे पूर्ण बालपण हे ब्रिटेनमध्ये केले आहे. आपल्या करिअरची सुरूवात अँड्यू टेटने बॉक्सर म्हणून केली. बॉक्सिंगच्या करिअरमध्ये त्याला यश मिळाले. परंतू त्यानंतर तो बॉक्सिंगपासून दूर गेला. अँड्यू टेट कायमच महिलांबद्दल वादग्रस्त विधाने करतो. यामुळे अनेक सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर त्याला बॅन करण्यात आलंय.