अनेकांना परदेशात जाऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्याची इच्छा असते. अनेकजण विदेशात जातातही, मात्र, चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी तुम्ही कोणता देश निवडता हेही महत्त्वाचं आहे. चला तर मग सर्वाधिक पगार देणाऱ्या जगातील 10 देशांची माहिती घेऊ.
मध्य यूरोपमधील ऑस्ट्रिया हा एक छोटासा देश आहे. मात्र त्याचा लाईफ ऑफ स्टँडर्डमध्ये कायमच वरचा नंबर राहिलाय. ऑस्ट्रेलियात काम करणाऱ्या व्यक्तीला सरासरी वार्षिक 50 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 36 लाख रुपये पगार मिळतो.
नॉर्वेची ओळख इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छ शहरांसाठी आहे. इथं काम करणाऱ्यांना वर्षाला सरासरी 51 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये पगार मिळतो.
यूरोपमझीस बेल्जियमध्ये फ्लेमिश डच, फ्रेंच आणि जर्मन अशा 3 अधिकृत भाषा आहे. इथं इंग्रजीही बोलली जाते. बेल्जियममध्ये 52 हजार डॉलर म्हणजेच वर्षाला जवळपास 38 लाख रुपये पगार मिळतो.
ऑस्ट्रेलिया जगातील एक आर्थिक शक्ती असलेला देश म्हणून ओळखला जातो. येथे कर्मचाऱ्यांना वार्षिक 53 हजार डॉलर म्हणजे जवळपास 39 लाख रुपये पगार मिळतो.
चांगल्या पगारासाठी तुम्ही युरोपमधील नेदरलँडचाही विचार करु शकता. तेथे वार्षिक 54 हजार डॉलर म्हणजे 40 लाख रुपये पगार आहे. याशिवाय येथील वाहतूक व्यवस्था देखील खूप चांगली आहे.
डेनमार्क एक स्कँडिनेवियाई देश असून येथील जगण्याचा दर्जा चांगला आहे. डेनमार्कमध्ये सरासरी वर्षाला 55 हजार डॉलर म्हणजे 41 लाख रुपये पगार दिला जातो. डेनमार्क जगात व्यापार करण्यासाठी सर्वात सुलक्ष देशही आहे.
अमेरिका केवळ जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश नाही तर तेथे पगारही तसाच आहे. अमेरिकेत वर्षाला सरासरी 63 हजार डॉलर म्हणजे 46 लाख रुपये पगार मिळतो.
स्विट्जरलँडमध्ये वर्षाला 64 हजार डॉलर म्हणजे 45 लाख रुपये पगार आहे.
पश्चिम यूरोपमधील छोटासा देश असलेल्या लक्जमबर्ग मध्ये सरासरी 65 हजार डॉलर म्हणजे 48 लाख रुपये वार्षिक पगार आहे.
आईसलंडमध्ये सरासरी 66 हजार डॉलर म्हणजे 49 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. या देशाची लोकसंख्या केवळ 3.5 लाख इतकी आहे.