नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा पहिला स्टेट विजिट असलेला दौरा आहे. आज पंतप्रधान मोदींच्या अमेरिकादौऱ्याचा दुसरा दिवस होता. पंतप्रधान मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. व्हाइट हाऊसमध्ये आज पंतप्रधान मोदींच जो आणि जिल बायडेन दाम्पत्याने शानदार स्वागत केलं. मोदींसाठी खास स्टेट डिनरच आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी खास आहे.
कारण या दौऱ्यात भारताच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे करार होणार आहेत. त्यामुळे मोदींचा हा अमेरिका दौरा दोन्ही देशांसाठी खूप महत्वाचा आहे. अमेरिकेने सुद्धा यावेळी मोदींच्या आदिरातिथ्यात कुठलीही कमतरता ठेवलेली नाहीय.
एका गिफ्टने सर्वांच लक्ष वेधलं
पंतप्रधान मोदींनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना काही खास वस्तू गिफ्ट केल्या. महत्वाच म्हणजे गिफ्ट केलेल्या सर्व वस्तू भारतात बनवण्यात आल्या आहेत. मोदींनी गिफ्ट केलेल्या भेटवस्तूंमध्ये एका गिफ्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. कारण त्या वस्तूची चमकच तशी होती.
बायडेन यांना गिफ्ट केलेला हिरा भारतात कुठे बनलाय?
पंतप्रधान मोदींनी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना भारतातील प्रयोगशाळेत बनवण्यात आलेला 7.5 कॅरेटचा एक हिरा गिफ्ट केला. हा ग्रीन डायमंड म्हणजे हिरवा हिरा आहे. गुजरातमधील सूरत स्थित एका कंपनीने हा हिरा बनवलाय.
कोण आहेत मुकेश पटेल?
मुकेश पटेल यांच्या सूरत येथील हिरे कारखान्यात हा ग्रीन डायमंड बनवण्यात आला. मुकेश पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी आहेत. सोशल मीडियावर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक फोटो आहेत. ग्रीन लॅब डायमंड ही मुकेश पटेल यांच्या मालकीची कंपनी आहे. सूरतच्या इच्छापूर भागात हा हिरे कारखाना आहे. “पंतप्रधान मोदींनी जिल बायडेन यांनी हिरा गिफ्ट करणं ही फक्त सूरत नाही, तर देशासाठी अभिमानाची बाब आहे” असं स्मित पटेल म्हणाला. तो मुकेश पटेल यांचा मुलगा आहे.
हिरा आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग
सूरतमध्ये बनवलेला हा हिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग आहे. या हिऱ्याची कटिंग आणि पॉलिशिंग सूरतमध्ये झालीय. सूरतच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांची जगभरात निर्यात होते.
7.5 कॅरेटचाच हिरा का निवडला?
मोदींनी जिल बायडेन यांना गिफ्ट केलेला हिरा हा इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण अनुकूल आहे. सौर ऊर्जा आणि पवन उर्जेपासून या हिऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच हे अमृत महोत्सवी 75 व वर्ष आहे. त्यासाठीच 7.5 कॅरेटच्या हिऱ्याची निवड करण्यात आली.
VIDEO | It was a proud moment for Surat’s artisans on Thursday when PM Modi gifted a 7.5 carat diamond to US First Lady Jill Biden at the White House. The green diamond that the PM gifted to Jill Biden was a lab-grown one, made in Surat.
Talking to PTI in Surat, Asmit Patel, the… pic.twitter.com/MRDz9dDSwd
— Press Trust of India (@PTI_News) June 22, 2023
ज्वेलरीशिवाय हा हिरा अजून कुठे वापरला जातो?
ज्वेलरी सेक्टर सोडल्यास लॅबमध्ये बनवलेल्या हिऱ्यांचा कॉम्प्युटर चीप, सॅटलाइट आणि 5 जी नेटवर्कमध्ये वापर होतो. सिलिकॉन स्थित प्रोसेसरपेक्षा कमी ऊर्जेत वेगाने काम करण्याची या लॅबमध्ये बनलेल्या हिऱ्याची क्षमता असते.
मोदींनी गिफ्ट केलेल्या हिऱ्याची किंमत किती असू शकते?
खाणीत सापडणाऱ्या हिऱ्यापेक्षा लॅब डायमंडची किंमत कमी असते. नैसर्गिक हिऱ्यासारखेच ते दिसतात. आकार आणि ग्रेडवर लॅब डायमंडची किंमत ठरते. 7.5 कॅरेटच्या अस्सल हिऱ्याची किंमत 8.3 लाखाच्या घरात आहे. तेच लॅबमध्ये बनलेल्या हिऱ्याची किंमत 1.8 लाखाच्या घरात आहे.