वॉशिंग्टन : इंटरनेट डाऊन झाल्यानं अमेझॉन(Amazon), झोमॅटो(Zomato) आणि पेटीएमसह (PayTm) जगभरातील हजारो वेबसाईट्स गुरुवारी (22 जुलै) ठप्प झाल्या. सोनी लिव (Sony liv), हॉटस्टारसारखे (Hot Star) ओटीटी (OTT) प्लॅटफार्मवर देखील युजर्सला अडथळे आले. बहुतांश कंपन्यांच्या वेबसाईटचा वेग कमी झाला किंवा पूर्णपणे बंद झाल्या. पेटीएमसारख्या अॅपवर पेमेंट होण्यात अडचणी आल्या. याशिवाय अनेक बँक, टेक कंपन्या आणि एअरलाईन्सचाही यात समावेश आहे.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डेटेक्टरनुसार डीएनएस म्हणजे डोमेन नेम सिस्टममध्ये (DNS) बिघाड झाल्यानं जगभरात वेबसाईट्स काही वेळेसाठी बंद झाल्या होत्या. इंटरनेट आउटेजमुळे या कंपन्यांच्या वेबसाईट्स लोडच होत नव्हत्या. सिस्टम डोमेन नेम सिस्टम सर्विसमध्ये Error दिसत होती. क्लाउड सर्विस प्रोवाइडर कंपनी अकामाई टेक्नोलॉजीजने (AKAM.O) एज DNS सर्विसमधील बिघाड दूर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. गुरुवारी (22 जुलै) रात्री 10:17 वाजता कंपनीने ट्विट करत इश्यू रिसॉल्व केल्याचं सांगितलंय.
1. नेटवर्क कंजेशन (Network Congestion):
इंटरनेट आउटेजची ही सर्वात सामान्य अडचण आहे. जेव्हा एकाच भागातील खूप लोक नेटवर्कपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नेटवर्कची गर्दी तयार होते. त्यामुळे नेटवर्क कंजेशनची स्थिती तयार होऊन सर्किट क्वालिटी खराब होते.
2. सेवा पुरवठादाराची लिंक फेल होणे (A failed link to service provider):
डिवाइस आणि सर्वरमधील लिंक खराब होते आणि कनेक्ट होत नाही तेव्हा ही अडचण येते. वादळ, वारा, प्राण्यांमुळे केबल तुटली तरी सर्विस प्रोवायडरची लिंक फेल होते.
3. इंटरनेट स्पीडमधील चढउतार (Speed fluctuation from Internet provider
4. यंत्रणेतील बिघाड (Equipment failure)
5. ऑपरेशनल त्रुटी (Operation error)
Know the 5 reason behind internet down