Photos : महिलांना पूर्ण स्वातंत्र्य, फॅशन आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध काबुल, तालिबानच्या आधी अफगानिस्तान कसा होता?
अफगाणी महिलांना 1919 मध्ये पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे ब्रिटेनम आणि अमेरिकाच्या महिलांना मताचा अधिकार मिळाल्यानंतर एक वर्षांनी (Afghanistan Before Taliban Pictures). 1960 च्या दशकात पर्दा प्रथा संपवण्यात आली. मात्र, 1970 मध्ये अफगाणमध्ये सत्तापालट झालं.
1 / 10
तालिबानच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अफगाणिस्तानकडे आहे. तालिबानने पुन्हा डोकं वर काढत संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तेथे शरिया कायदा लागून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे.
2 / 10
विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधी देखील तालिबानने 1996-2001 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. तेव्हा महिलांवर अनेक निर्बंध आले होते. आता पुन्हा असं निर्बंध लादले जात आहेत (Afghanistan Before 1970).
3 / 10
सध्या तालिबानच्या आक्रमणासह अफगाणिस्तानमधील महिलांच्या सामाजिक स्थितीविषयीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यात तालिबानपूर्वीचा अफगाणिस्तान आणि नंतरची स्थिती असं दाखवलं जातंय.
4 / 10
अफगाणिस्तानमध्ये पगडी आणि हिजाब पुन्हा अनिवार्य होणार?
5 / 10
तालिबानचं वर्चस्व असलेल्या भागात महिलांची तालिबानी कट्टरतावाद्यांशी जबरदस्तीने लग्नं लावली जात आहेत. महिलांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावले जात आहेत. केवळ पुरुषासोबतच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलीय (Taliban Rules For Women).
6 / 10
असं असलं तरी अफगाणिस्तानमधील परिस्थिती कायम अशीच नव्हती. एकेकाळी हा देश फॅशन, रोजगार आणि करिअरबाबत खूप पुढे होता. सोशल मीडियावर तालिबानच्या नियंत्रणाआधी महिलांचे आधुनिक वेशातील काही फोटो व्हायरल होत आहेत (Afghanistan Education Before the Taliban). 70 च्या दशकात एका महिलेने फॅशनेबल कपडे घातलेले दिसत आहेत.
7 / 10
दरम्यान 4 दशकं सुरू असलेल्या तालिबान्यांच्या युद्धानंतर परिस्थिती प्रचंड बदलली आहे. सध्या महिलांना विना बुरखा राहणं शक्य नाहीये (Afghanistan Culture Before Taliban). विधवा महिलांचं स्थान तर अगदी धोक्यात आलंय, कारण तालिबान्यांच्या नजरेत विधवा स्त्रीयांना कोणतंही सामाजिक स्थानक नाहीये.
8 / 10
अम्नेस्टी या मानवाधिकार संस्थेच्या एका अहवालात महिलांच्या स्थितीबाबत एक उदाहरण दिलंय. यात होरिया मोसादिक यांचं उदाहरण देण्यात आलंय. यानुसार होरिया तेव्हा लहान होत्या जेव्हा 1979 मध्ये सर्वात आधी रशियाच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला. होरियाने सांगितलं तेव्हा माझी आई मिनी स्कर्ट घालत होती. ती आम्हाला फिल्म पाहायला घेऊन जात. माझी काकू तेव्हा काबुल विद्यापीठात शिकायला जात होती.
9 / 10
अफगाणी महिलांना 1919 मध्ये पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे ब्रिटेनम आणि अमेरिकाच्या महिलांना मताचा अधिकार मिळाल्यानंतर एक वर्षांनी (Afghanistan Before Taliban Pictures). 1960 च्या दशकात पर्दा प्रथा संपवण्यात आली. मात्र, 1970 मध्ये अफगाणमध्ये सत्तापालट झालं आणि सोवियत युनियनच्या नियंत्रणाच्या काळात 80 आणि 90 च्या दशकात मुजाहिदीन समुह आणि सरकारमध्ये संघर्ष झाला. याच काळात तालिबानचा उदय होऊन परिस्थिती पालटली.
10 / 10
तालिबानने शरिया कायदा लागू केला. यानुसार महिलांना शाळेत जाणं बंद केलं, शिक्षणावर बंदी घातली, नोकरीवर बंदी घातली, पुरुषाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घातली, सार्वजनिक ठिकाणी शरीराचा कोणताही भाग दिसू नये असं फर्मान काढलं, राजकारणात प्रवेशावर बंदी घातली, महिलांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास बंदी घातली. त्यामुळे उपचाराअभावी महिलांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम झाला.