लश्कर-ए-तैयबाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी अबु कतालची शनिवार रात्री पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. तो NIA च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचाया यादीमध्ये होता. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या झेलम भागता काल रात्री आठ वाजता अबु कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोराने अबु कतालवर अंदाधुंद गोळ्यांची फायरिंग केली. यात त्याचा मृत्यू झाला. POK मध्ये बसून तो जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले घडवत होता.
हाफिज सईदने जम्मू कश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी अबु कतालवर सोपवली होती. हाफिजने कतालला लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवलं होतं. कतालला हाफिजकडून ऑर्डर मिळायच्या. त्यानंतर तो कश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले करत होता. नऊ जूनला रियासीमध्ये झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. सैन्यासह विविध सुरक्षा यंत्रणांसाठी अबु कताल डोकेदुखी बनला होता.
कुठल्या हल्ल्यात होता हात?
2023 साली राजौरी हल्ल्यातील सहभागाप्रकरणी अबु कतालच नाव राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) आरोपपत्रात होतं. एक जानेवरी 2023 ला नागरिकांना लक्ष्य करुन राजौरीच्या ढांगरी गावात दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर दुसऱ्यादिवशी IED स्फोट झाला होता. यात सात लोकांचा मृत्यू झाला होता. अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते.
कोणाच्या निर्देशावरुन लॉजिस्टिक मदत?
या हल्ल्यासंबंधी NIA ने आपल्या आरोपपत्रात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाच्या तीन हँडलर्सच्या नावाचा समावेश केला होता. यात सैफुल्ला उर्फ साजिद जट्ट उर्फ अली उर्फ हबीबुल्लाह उर्फ नुमान उर्फ लंगडा उर्फ नौमी, मोहम्मद कासिम आणि अबु कताल उर्फ कताल सिंधी अशी त्यांची नाव होती. चौकशीत समोर आलं की, अबु कतालच्या निर्देशावरुन दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत मिळाली होती. रियासी हल्ल्यानंतर ढांगरीमध्ये जवळपास तीन महीने दहशतवाद्यांना भोजन, आश्रय आणि अन्य प्रकारची लॉजिस्टिक मदत देण्यात आली.
यात्रेकरुंच्या बसवर केला होता हल्ला
9 जूनला जम्मू-काश्मीरच्या शिव-खोड़ी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याचा मास्टरमाइंड अबु कताल होता. त्याशिवाय काश्मीरमध्ये अनेक मोठे हल्ले घडवून आणण्यात त्याचा हात होता. NIA ने 2023 सालच्या राजौरी हल्ल्यासाठी अबू कताललाच जबाबदार ठरवलं होतं.