युद्ध लढताना शत्रूला कसं नामोहराम करायचं हे इस्रायलला चांगलं माहित आहे. मागच्या दोन दिवसांपासून लेबनानमध्ये जे सुरु आहे, त्यामुळे अख्ख जग हैराण झालं आहे. आधी मंगळवारी 17 सप्टेंबरला हिज्बुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले होते. बुधवारी अनेक ठिकाणी वॉकी-टॉकीमध्ये ब्लास्ट झाले. नेमकं आपल्यासोबत काय घडतय? आणि काय घडणार? याची लेबनानला कल्पना सुद्धा नाहीय. त्यामुळे सध्या लेबनानमध्ये भिती, दहशतीच वातावरण आहे. आज लेबनानमध्ये जे घडतय त्याची प्लानिग इस्रायलने काही वर्ष आधीच करुन ठेवली होती. एखाद्या चित्रपटाला साजेस असं हे कथानक आहे. जे आपण चित्रपटात पाहतो, तसं इस्रायलने प्रत्यक्षात करुन दाखवलय.
हिज्बुल्लाह चीफ नसरुल्लाहने सदस्यांना सेलफोन, इंटरनेट कॉलिंगऐवजी पेजर आणि वॉकी टॉकीचा वापर करण्याचा सल्ला देत होता. त्याचवेळी इस्रायलने ऑपरेशन लेबनानची तयारी केली. नसरुल्लाह यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हिज्बुल्लाह समर्थकांना संबोधित करताना म्हणाला की, जर इस्रायल हाय-टेक होत असेल तर आपण लो-की होऊया. तुमच्या हातातील सेलफोन इस्रायलचे एजंट आहेत. त्यामुळे पेजर वापरण्याच त्याने आवाहन केलं. इस्रायलला लोकेशन ट्रॅक करता येऊ नये, हा त्यामागे उद्देश होता.
कसा ट्रॅप रचला?
इस्रायलने युरोपच्या हंगेरीत बुडापेस्टमध्ये 2022 साली दोन ते तीन शेल कंपन्या उभ्या केल्या. याच शेल कंपनीपैकी एक होती, BAC Consulting KFT. याच कंपनीने नंतर तैवानच्या Gold Apollo कंपनीसोबत लॉन्ग टर्म पार्टनरशिप केली. या पार्टनरशिप अंतर्गत पेजर आणि वॉकी टॉकी सारखे वायरलेस डिवाइस बनवायला सुरुवात केली.
असं होतं युरोप कनेक्शन
रिपोर्टनुसार, इस्रायलच्या प्लान अंतर्गत उभ्या करण्यात आलेल्या या कंपनीला आंतरराष्ट्रीय पेजर उत्पादक म्हणून दाखवण्यात आलं. हीच कंपनी तैवानच्या गोल्ड अपोलो ब्रांड नेमसह पेजर आणि वॉकी टॉकी तयार करायची. म्हणूनच काल गोल्ड अपोलो कंपनीच्या मालकाने ब्लास्ट झालेले पेजर आम्ही तयार केलेले नाहीत. युरोपमधल्या कंपनीने बनवले आहेत, असं सांगितलं.
सगळा फोकस हिज्बुल्लाहच्या पेजर ऑर्डरवर
इस्रायलच्या तीन इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. इस्रायलने अशा दोन ते तीन पेजर उत्पादक कंपन्या उभ्या केल्या होत्या. BAC आपली विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी सामान्य ऑर्डर घेऊन डिलीवरी करायचे. पण त्यांचा सगळा फोकस हिज्बुल्लाहच्या पेजर ऑर्डरवर होता.
पेजर खरेदीसाठी इस्रायलने कसं भाग पाडलं?
ही कंपनी PETN स्फोटक असलेली बॅटरी तयार करुन पेजरमध्ये फिट करायची. हे पेजर्स 2022 मध्ये पहिल्यांदाच लेबनानाला पाठवण्यात आले असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. त्यावेळी लेबनानला पाठवलेल्या पेजर्सची संख्या कमी होती. पण इस्रायलने हिज्बुल्लाहवर हल्ले वाढवले. त्यानंतर नसरुल्लाहने मोबाइलचा वापर कमी करण्यावर भाष्य केलं. त्याचवेळी BAC ने पेजर्सच उत्पादन वाढवलं.
इस्रायलसाठी बटण
हिज्बुल्लाहसाठी हे पेजर, वॉकी-टॉकी त्यांची सुरक्षा साधनं होती. पण इस्रायलच्या इंटेलिजन्स अधिकारी या उपकरणांना BUTTON बोलायचे. बटण यासाठी कारण योग्यवेळी बटण दाबून ऑपरेशन प्रत्यक्षात आणायच. 17-18 सप्टेंबरला इस्रायलने हेच बटण दाबून जगाला हैराण केलं.