लंडन – इंग्लंडला अखेरीस नवा पंतप्रधान मिळाला आहे. 47 वर्षीय लिज ट्रस (Liz Truss)हा इंग्लंडच्या नव्या पंतप्रधान (Prime Minister England)असतील. थोड्याच वेळापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. लिज ट्रस आता बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. लिज यांना इंग्लंडच्या राजकारणातील फायरब्रांड (firebrand)नेत्या म्हणून ओळखले जाते. दोन महिने सुरु असलेल्या या इलक्शन कॅम्पेनमध्ये त्या कधीही डिफेन्सिव्ह दिसल्या नाहीत. त्या कायम आक्रमक भूमिकेतच पाहायला मिळाल्या
UK Foreign Secretary Liz Truss becomes the new British Prime Minister, succeeds ousted Boris Johnson; defeats rival Rishi Sunak pic.twitter.com/6mrSLHkjqo
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 5, 2022
7 जुलै रोजी बोरिस जॉन्सन यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंझर्वेटिव्ह पार्टीत लिज ट्रस यांचा मुकाबला भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्याशी होता. पक्षाच्या 1.60 लाख सदस्यांनी मतदान केले होते. एका सर्वेक्षणानुसार पक्षातील 10 पैकी 6 सदस्य हे लिज ट्रस यांच्यासोबत होते.
लिज ट्रस्ट यांचे वय 47 आहे. त्यांचा जन्म ऑक्सफर्डमध्ये झाला होता. लिड्सच्या राऊंडहे स्कूल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांचा विवाह हग ओ लैरी यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुली आहेत. साउथ वेस्ट नॉरपॉक या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत.
कंझर्व्हेटिव्ह म्हणजेच हुजूर पक्षाच्या खासदारांनी केलेल्या मतदानाताच्या पाच राऊंडमध्ये ऋषि सुनक यांनी लिज ट्रस यांना मात दिली होती. मात्र अंतिम निर्णय हा पक्षाचे 1 लाख 60 हजार सदस्य करणार होते. त्यात लिज यांनी बाजी मारली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेही सुनक यांच्या पाठिशी नव्हते.
लिज ट्रस या सात वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी शाळेच्या नाटकांमध्ये माजी पंतप्रधान, आयर्न लेडी मार्गारेट थैचर यांची भूमिका केली होती. त्या लिज यांच्या आदर्श आहेत. लिज यांच्या भावाने एका मुलाखतीत सांगितले होते की – त्यांना लहानपाणापासून पराभवाची चीड आहे. लहानपणी जेव्हाही ते दोघे खेळत असत तेव्हा त्यांचा पराभव होऊ नये, यासाठी लिज दक्ष असत.