न्यूयॉर्क: गेल्या काही दिवसांपासून हिंदूविरोधी द्वेष (Anti-Hindu hatred) काही देशातून पाहायला मिळत आहे. वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया आणि अमेरिकासारख्या देशातून हिंदू विरोधी वातावरण कधी कधी डोके वर काढत असल्याने परदेशातही या घटनांमुळे अनेका धक्का बसला आहे. त्यामुळे परदेशातील अनेक भारतीयांसह परदेशी नागरिकांनी हिंदू विरोधी होणाऱ्या कारवायाविरोधात आवाज उठवत अशा घटनांचा निषेध नोंदविला आहे. मूर्तींची तोडफोड करणे, प्रतिमांची विटंबना करणे असे प्रकार सध्या परदेशात घडत आहेत. त्यामुळे पाकिस्तान बांगलादेशाप्रमाणेच अमेरिकेतही (America) हिंदू विरोधी द्वेषातून मंदिर मूर्तींची तोडफोड पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रकार वाढले आहेत. समाजकंटक आणि गुरुवारी मध्यरात्री न्यूयॉर्कमध्ये पुन्हा हैदोस घातला आहे आणि हिंदू मंदिरांच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या प्रतिमेची (Mahatma Gandhi) तोडफोड करण्यात आली आहे.
मध्यरात्री दीडच्या सुमारास 6 हल्लेकोरांनी हे कृत्य करून कारमधून फळ काढला आहे. हिंदूंशी संबंधित मूर्ती आणि प्रतिमा तोडफोडीची ही मागील दोन आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
या तोडफोडेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. साउथ रिचमंड येथील क्वीन्स काउंटीच्या तुलसी मंदिर परिसरात महात्मा गांधीजींची प्रतिमा लावण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरानी गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हातोड्याच्या सहाय्याने या प्रतिमेची तोडफोड केली. त्यानंतर तेथील रस्त्यावर मोठ्या अक्षरात ग्रँड पी आणि डॉग असे वादग्रस्त शब्द लिहून हिंदू विरोधी द्वेष व्यक्त करण्यात आला आहे.
हे कृत्य केल्यानंतर सर्वजण कारमधून पळून गेले, अज्ञात हल्लेखोरांच्या या कृत्याविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवले असून हल्लेखोर तोडफोड करताना हिंदी भाषेत बोलत होते असे प्रत्यक्षदर्शनी पोलिसांनी सांगितले. अमेरिकन असेंबलीचे सदस्य जेनिफर राजकुमार यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
जून 2020 मध्ये वॉशिंग्टन येथील हिंदुस्तानी दूतावासा बाहेरील गांधीजींच्या प्रतिमेवर स्प्रे पेंटिंग करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा गांधीजींच्या प्रतिमेचे नुकसान करण्यात आले होते. जानेवारी 2021 मध्ये कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल पार्कमध्ये गांधीजींच्या 6 फुटी प्रतिमेची तोडफोड करण्यात आली होती, यंदा 26 जानेवारीला वॉशिंग्टनमधील गांधीजींच्या प्रतिमेवर खलिस्तानीने आपला झेंडा फडकवला होता.