इस्लामाबाद : नोबेल पुरस्कार (Nobel Prize) विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) आणि तिचा पती असर मलिक (Asser Malik) एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नवीन वर्षाचा संकल्प करण्याच्या दृष्टीनं गेम खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मलाला आणि तिचा पती असर मलिक टेबलच्या वर काही अंतरावर ठेवलेल्या ग्लासमध्ये पेन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कोणता निश्चय कारायचा आणि कोणता नाही, हे ठरवलंय.
दोघांचाही चुकतो अंदाज
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 1 मिनिट 22 सेकंदाचा आहे. व्हिडिओमध्ये मलाला तिच्या पतीला विचारते, की मी येत्या वर्षभरात जिममध्ये जावं का? नंतर ती पेन ग्लासमध्ये टाकण्यासाठी फेकते. तिचा अंदाज चुकतो. यानंतर तिचा नवरा असर प्ले स्टेशन विकत घेऊ का असे विचारतो आणि पेन ग्लासच्या दिशेनं फेकतो, पण त्याचाही अंदाज चुकतो.
“If you shave your beard, just leave the house”
Hahaha I love @Malala ♥️?
— PratPanc (@PratPanc) December 18, 2021
दाढी काढण्याची परवानगी नाही
मलाला पुन्हा विचारते, की असरनं दाढी काढावी का? त्याला ती स्वतःच उत्तर देते आणि म्हणते की नाही, तुला हे करण्याची परवानगी नाही. असं केल्यास घर सोडावं लागेल. यानंतर असरनं मलालाला ‘नो शॉपिंग जानेवारी’ साजरा करायचा का, असा सवाल केला. त्यानंतर तो पेन फेकतो, मात्र ग्लासवर आदळल्यानंतर तो खाली पडतो. यावर मलाला म्हणते, की तो खूपच जवळ होता.
व्हिडिओच्या शेवटी देणगीची मागणी
यानंतर मलालानं पुढचा प्रश्न विचारला, की मी हसन मिनाजला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करावं का? हसन मिनाज हा अमेरिकन कॉमेडियन आहे. मात्र, यावेळीही तिचा पेन ग्लासवर आदळला आणि खाली पडला. मलाला म्हणते, की मला वाटतं की आपण ते होय म्हणून पाहिलं पाहिजे. कारण तो ग्लासला स्पर्श करतोय. यानंतर असरनं हसन मिनाजला फॉलो करू का असं विचारलं, पण त्याचा पेनही ग्लासच्या खूप पुढे पडला. व्हिडिओच्या शेवटी मलाला ‘हसन मिनाजसह जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मलाला फंडात दान करावं’, असं म्हणताना ऐकू येतं. यावेळी ती स्वतः उठते आणि पेन जवळच्या ग्लासात टाकते.