लिलाँग्वे : आफ्रिकेतील मलावी या देशाने तब्बल 19 हजार 610 कोरोना लसी जाळून नष्ट केल्या आहेत. असं करणारा हा आफ्रिकेतील पहिलाच देश ठरलाय. या देशाच्या आरोग्य मंत्रालयानेच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या सर्व लस एस्ट्राझेनेका कंपनीच्या होत्या. यामुळे लोकांना त्यांना दिल्या जाणाऱ्या कोरोना लस या सुरक्षित असल्याची खात्री होईल, असंही या देशानं नमूद केलं (Malawi country from Africa burned AstraZeneca Corona Vaccine know all about it).
मलावी देशाने हजारो कोरोना लस नष्ट केल्यानंतर यावर जगभरात चर्चा सुरु झालीय. तसेच कोरोना लस जाळून नष्ट करण्याचं कारण विचारलं जात आहे. मलावी देशाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “नष्ट करण्यात आलेल्या सर्व 19 हजार 610 एस्ट्राझेनेका कोरोना लस या मुदत संपलेल्या म्हणजे Expiry date संपलेल्या होत्या.” जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुरुवातीला या देशांनी या मुदत संपलेल्या कोरोना लसी नष्ट करु नये असा सल्ला दिला होता. मात्र, आता WHO ने देखील आपल्या सल्ल्यात बदल केला आहे.
Many thanks to the Media, Anti Corruption Bureau, National Audit Office, Malawi Police for witnessing the counting of the expired vaccine vials, loading of the same vials into the incinerator and then the setting ablaze of the vials pic.twitter.com/hrXkQcDvQ5
— Hon Khumbize Kandodo Chiponda MP (@HonKandodo) May 19, 2021
“शंकाकुशंकांमुळे कोरोना लसीकरण करुन घेणाऱ्यांचं प्रमाण कमी”
मलावीमध्ये कोरोना लसीबाबतच्या अनेक शंकाकुशंकांमुळे कोरोना लसीकरण करुन घेणाऱ्यांचं प्रमाण कमी होतं. मुदतबाह्य लसी नष्ट केल्यानं आता लसीकरण करुन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, असंही मलावीने नमूद केलंय. 1 कोटी 80 लाख लोकसंख्या असलेल्या मलावी देशात आतापर्यंत 34 हजार 232 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. त्यापैकी 1153 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
मलावीला 26 मार्च रोजी आफ्रिकन संघाकडून 1 लाख 2 हजार कोरोना लस
मलावीला 26 मार्च रोजी आफ्रिकन संघाकडून 1 लाख 2 हजार कोरोना लस मिळाल्या. यापैकी जवळपास 80 टक्के लसींचा वापर झाला. मात्र, उर्वरित लसींची वापराची मर्यादा संपली. या लसींची एक्स्पायरी डेट 13 एप्रिल होती.
“लसी जाळून नष्ट केल्या नसत्या तर हे लोक लसीकरणासाठी आलेच नसते”
मलावीच्या आरोग्य विभागाने सांगितलं की लोकांना आमच्याकडे मुदतबाह्य कोरोना लस असल्याचं समजलं. त्यानंतर लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. जर आम्ही या लसी जाळून नष्ट केल्या नसत्या तर हे लोक लसीकरणासाठी आलेच नसते आणि त्यांनाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असता.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :