मालदीव आणि चीन आखताय मोठी योजना, पाहा दोघांमध्ये काय झाला करार

| Updated on: Mar 05, 2024 | 11:40 PM

चीनने मालदीवला 12 इको-फ्रेंडली रुग्णवाहिका भेट दिली आहेत. रविवारी मालदीवमध्ये झालेल्या एका समारंभात चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी रुग्णवाहिकेचे भेट पत्र दिले.

मालदीव आणि चीन आखताय मोठी योजना, पाहा दोघांमध्ये काय झाला करार
Follow us on

Maldive china deal : चीनने सोमवारी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोफत लष्करी मदत देण्यासाठी मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना माघारी बोलवण्याची सूचना केली होती. मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी चीनच्या आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य कार्यालयाचे उपसंचालक मेजर जनरल झांग बाओकून यांची भेट घेतली.

चीनने मालदीवला 12 इको-फ्रेंडली रुग्णवाहिकाही भेट दिल्या आहेत. रविवारी मालदीवच्या आरोग्य मंत्रालयात आयोजित समारंभात चीनचे राजदूत वांग लिक्सिन यांनी मालदीवला रुग्णवाहिका भेट देणारे पत्र दिले. अलीकडेच, मालदीवने चीनी हाय-टेक संशोधन जहाज जियांग यांग हाँग 03 ला माले बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली.

या जहाजाला हिंद महासागरात जाण्यास श्रीलंकेने परवानगी नाकारल्यामुळे चिनी जहाजाला मालदीवला जावे लागले. श्रीलंकेने आपल्या आदेशात म्हटले आहे की ते कोणत्याही संशोधन जहाजाला त्यांच्या आर्थिक क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही. भारताच्या सांगण्यावरून श्रीलंकेने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे आता मालदीवने सर्व भारतीय सैनिकांना माघारी जाण्यास सांगितले आहे. मंगळवारी मुइज्जू म्हणाले की आता मालदीवमध्ये नागरी पोशाखात भारतीय कर्मचारी देखील नसतील, तर यापूर्वी तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जागी लष्करी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे मान्य केले गेले होते.