भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताने मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं. परराष्ट्र मंत्री मूसा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “भारत एक मोठा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. आमच्यासह अन्य राष्ट्रांसाठी भारत एक प्रेरणास्थान आहे” सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मालदीव आणि भारतामधील संबंधांबद्दल सुद्धा बोलले. दोन्ही देशांच्या सक्रीय सहकार्याने संबंध मजबूत झाले आहेत. हे संबंध भक्कम ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याच सुद्धा त्यांनी सांगितलं.
मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चीन समर्थक मुइज्जू यांनी शपथ घेतल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले. हे संबंध सुधारण्यासाठी मागच्या काही दिवसांपासूव अनेक स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाली. या महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीवच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रपती मुइज्जूसह मालदीवच्या नेतृत्वाची भेट घेतली. याआधी जून महिन्यात मुइज्जू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी दिल्लीत आले होते. “मालदीव आणि भारतामध्ये दीर्घ काळापासून सुरु असलेल्या सहकार्यावर मी विचार केला. आमचे संबंध द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून पुन्हा मजबूत झाले आहेत” असं मूसा म्हणाले.
Thank you Excellency @MoosaZameer for gracing this celebration of our lasting friendship.
We are confident that under the leadership of PM @narendramodi and President @MMuizzu, our relationship will scale new heights and the bonds of friendship will become even stronger. https://t.co/GjZOuG5sQZ
— Amb Munu Mahawar | मनु महावर (@AmbMunu) August 16, 2024
भारतीय राजदूताने काय उत्तर दिलं?
मूसा यांनी एक्सवर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले. ‘स्वातंत्र्य दिनासाठी भारतात बोलवल्याबद्दल भारतीय राजदूत मनु महावर यांचे आभार मानले’ त्यावर महावर यांनी उत्तर दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वात आमचं मैत्रीच नातं अजून भक्कम होईल” असं महावर यांनी पोस्टमध्ये म्हटलय.