भारताचा आणखी एक शेजारी देश आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील परकीय चलनाचा साठा जवळपास संपत आला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच हे संकट ओढावले आहे. चीनवर अधिक विश्वास ठेवणं मालदीवला महागात पडले आहे. कारण चीनने आतापर्यंत अनेक देशांना कर्ज देऊन गरीब बनवले आहे. मालदीवने चीनकडून इतके कर्ज घेतले आहे, जे आता फेडतांना चांगलेच संकाटात सापडले आहेत. ज्या व्यक्तीने मालदीवला या स्थितीत आणले आहे त्या नेत्याचे नाव मोहम्मद मुइज्जू आहे. कारण मुइज्जू यांच्या धोरणांमुळे मालदीव गरिबीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
मालदीव मॉनेटरी अथॉरिटी (MMA) ने अर्थ मंत्रालयाला इशारा देणारे पत्र पाठवले आहे. त्यात लिहिले आहे की, जर परिस्थिती अशीच राहिली तर देशातील वापरण्यायोग्य डॉलरचा साठा ऑगस्टपूर्वी संपुष्टात येऊ शकतो. मालदीव सरकारने 25 दशलक्ष डॉलर्सचे तेल बिल भरण्यास सुरुवात केली तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य उघड झाले. त्यांना एका दिवसात इतके मोठे पेमेंट करायचे होते. यात उशीर करता येणार नव्हते. त्यामुळे मालदीवच्या परकीय चलनाचा साठा आता नकारात्मक झालाय.
मालदीवच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होण्यामागची अनेक कारणे आहेत. यामध्ये कर्जाची परतफेड, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात तसेच परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत यासारख्या सरकारी योजनांचा समावेश आहे. मालदीव मॉनेटरी अथॉरिटीने आधीच इशारा दिला होता की वर्षाच्या सुरुवातीला अतिरिक्त महसूल मिळविल्याशिवाय, सरकारला बजेट तूट व्यवस्थापित करण्यात अडचणी येतील. मालदीवचा आंतरराष्ट्रीय साठा जूनच्या अखेरीस US$509 दशलक्ष वरून जुलैच्या अखेरीस US$395 दशलक्ष इतका घसरला होता.
मालदीवच्या बँकिंग क्षेत्राने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. बँक ऑफ मालदीव्स (BML) ने डॉलर व्यवहार प्रतिबंधित करण्यासाठी पावले उचलली, ज्यात रुफिया कार्डसह डॉलरचे व्यवहार अवरोधित करणे आणि क्रेडिट कार्ड मर्यादा $100 पर्यंत मर्यादित करणे समाविष्ट आहे. “या वर्षी, राष्ट्रीय बँकेने आपल्या ग्राहकांकडून सुमारे $60 दशलक्ष किमतीचे विदेशी चलन खरेदी केले, परंतु कार्डचा वापर त्यापेक्षा तिप्पट होता,” कार्ल स्टमके, सीईओ आणि बीएमएलचे एमडी म्हणाले. तथापि, नियामकांच्या सूचनेनंतर, बँकेने त्यांची अंमलबजावणी होताच हे निर्बंध मागे घेतले.
गंभीर आर्थिक परिस्थिती असूनही, अर्थ मंत्रालयाने म्हटले की, साठा स्थिर होईल असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले असताना, MMA ने साठा पातळी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी अधिक पारदर्शकतेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, लोकांना स्पष्ट शब्दात सांगण्याची गरज आहे की आर्थिक परिस्थिती या टप्प्यावर कशी आली आहे, पुढे काय होणार आहे आणि त्यातून सावरण्यासाठी काय योजना आहे.
मालदीवचे माजी अर्थमंत्री इब्राहिम अमीर यांनी सरकारच्या अपेक्षित महसुलावर अवलंबून राहण्यावर टीका केली आणि फिच आणि मूडीज सारख्या एजन्सीद्वारे मालदीवच्या क्रेडिट रेटिंगमध्ये संभाव्य अवनतीचा इशारा दिला. “राज्याचे राजकोषीय धोरण अशा प्रकारे केले जाऊ शकत नाहीत. अमीर म्हणाले की. अनियंत्रित महसूल खर्चाच्या प्रतिकूल परिणामांकडेही त्यांनी लक्ष वेधले, विशेषत: राजकीय हेतूंसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती, ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती आणखी ताणली गेली आहे.