India-Maldive Row | मालदीवचे राष्ट्रपती भारत-चीनमध्ये कसा भेदभाव करतात, त्याचं उत्तम उदहारण

| Updated on: Feb 08, 2024 | 1:25 PM

India-Maldive Row | मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचा दुटप्पीपणा उघड झालाय. एकाबाजूला भारतीय सैन्याने आपला देश सोडून जावा यासाठी मालदीवच राष्ट्रपती मागे लागले आहेत, त्याचवेळी त्यांनी एकदम परस्पर विरोधी भूमिका घेतलीय.

India-Maldive Row | मालदीवचे राष्ट्रपती भारत-चीनमध्ये कसा भेदभाव करतात, त्याचं उत्तम उदहारण
Mohamed Muizzu
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

India-Maldive Row | आम्ही आमच्या देशात परदेशी सैन्याला तळ बनवू देणार नाही, असा मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचा दावा आहे. आम्ही आमची ताकत वाढवतोय, असं त्यांच म्हणणं आहे. लवकरच अशी वेळ येईल की, आम्हाला कुठल्या परदेशी सैन्याची गरज पडणार नाही, दुसऱ्या देशाच सैन्य मालदीवच्या भूमीवर नसेल असं मुइज्जू म्हणाले. पण आता मालदीवचा दुटप्पीपणा उघड झालाय कसा ते जाणून घ्या.

समुद्र, हवा आणि जमीन तिन्ही ठिकाणी मालदीवची ताकत वाढवण्याचा मुइज्जू यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच त्यांना आपल्या समुद्री भागात अंडरवॉटर सर्वे करायचा आहे. मुइज्जू यांच्यावर त्यांचा चीनकडे जास्त कल असल्याचा आरोप होतो. ते प्रो-चायना लीडर म्हणून ओळखले जातात.

भारताचे मालदीवमध्ये किती सैनिक?

10 मार्चपर्यंत भारतीय सैन्याची पहिली तुकडी मालदीवमधून मायदेशी परतेल. सध्या 88 भारतीय सैनिक मालदीवमध्ये आहेत. मालदीवमध्ये हेलिकॉप्टर्स आणि एअर क्राफ्टच्या उड्डाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याशिवाय मदत आणि बचाव कार्यामध्ये सुद्धा हे सैनिक मदत करतात.

तीन दिवसांपूर्वी श्रीलंकेतून पळवलं

एकाबाजूला भारतीय सैन्याने आपला देश सोडून जावा यासाठी मालदीवच राष्ट्रपती मागे लागले आहेत, त्याचवेळी त्यांनी चीनच हेरगिरी करणार जहाज जियांग यांग होंग 3 ला परवानगी दिली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी त्यांनी चिनी जहाजाला मालदीवला येण्याची परवानगी दिली होती. आता 8 फेब्रुवारी 2024 रोजी हे जहाज मालदीवची राजधानी माले येथे पोहोचेल. तीन दिवसांपूर्वी या जहाजाला श्रीलंकेतून पळवण्यात आलं होतं.

नेहमीच दगा दिलाय

चीनच हे जहाज मालदीवमध्ये असताना कुठलीही हेरगिरी करणार नाही, असा मालदीव सरकारकडून दावा करण्यात येतोय. पण यावर अजिबात विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. चीनने नेहमीच दगा दिलाय, विश्वासघात केलाय. मालदीवमध्ये राहून हे चिनी जहाज हेरगिरीच काम नक्की करेल. पण भारतीय नौदलाची सुद्धा या जहाजावर बारीक नजर असेल.

भारताची संरक्षण सिद्धता किती? हे शोधण्याच काम होतं

श्रीलंकेने वारंवार येणाऱ्या या चिनी जहाजाला आपल्या देशात येण्यास मनाई केली आहे. श्रीलंकेने या जहाजाला पळवून लावलय. कारण रिसर्चच्या नावाखाली हे जहाज नकाशा बनवण्याच काम करतं. समुद्र किती खोल आहे ते आणि जियोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न असतो. त्याशिवाय हे जहाज भारताची संरक्षण सिद्धता किती आहे? हे शोधण्याच काम देखील करतं. श्रीलंका, मालदीव हे भारताचे शेजारी आहेत.