India vs Maldives | मालदीवमधून सर्व भारतीय सैनिकांना हटवल्यानंतर ‘ती’ जागा कोण घेणार?

| Updated on: Feb 06, 2024 | 11:13 AM

India vs Maldives | सध्या भारत आणि मालदीवचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. भारताने आपल्या सर्व सैनिकांना माघारी बोलवाव, ही मालदीवची मागणी आहे. आता दोन्ही देश त्या दिशेने पावल टाकत आहेत. भारताने मालदीवमधून आपले सैनिक हटवल्यानतंर ती जागा कोण घेणार? हा मुद्दा आहे. हिंद महासागरात मालदीवच रणनितीक महत्त्व आहे.

India vs Maldives | मालदीवमधून सर्व भारतीय सैनिकांना हटवल्यानंतर ती जागा कोण घेणार?
India vs Maldives
Follow us on

India vs Maldives | मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी संसदेत भारतीय सैनिकांविरुद्ध सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत सरकार 10 मे पर्यत आपल्या सर्व सैनिकांना माघारी बोलवेल असं त्यांनी सांगितलं. मालदीवमधील भारतीय सैनिकांची उपस्थिती मागच्या काही काळापासून दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा बनली आहे. भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक एअरक्राफ्ट भेट म्हणून दिलं आहे. मदत, बचाव कार्य आणि मेडीकल इमर्जन्सीसाठी याचा वापर होतो. हेलिकॉप्टर आणि विमानांच्या देखभालीसाठी भारताचे 80 सैनिक मालदीवमध्ये तैनात आहेत. पण आता त्यांना रिप्लेस म्हणजे बदलल जाईल. या सैनिकांची जागा कोण घेणार? हा आता प्रश्न आहे.

मागच्या शुक्रवारी 2 फेब्रुवारीला भारत-मालदीव हाय लेव्हल कोअर ग्रुपची दुसरी मीटिंग नवी दिल्लीत झाली. भारत आपल्या तिन्ही एविएशन प्लॅटफॉर्मवरुन आपल्या सैनिकांना हटवण्यासाठी राजी झालाय, असं मालदीवच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलय. प्रेस रिलीजनुसार, 10 मार्चला एक प्लॅटफॉर्म आणि 10 मे रोजी उरलेल्या दोन प्लॅटफॉर्मवरुन सैनिकांना रिप्लेस करण्यात येईल. भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये सैनिकांना हटवण्याचा कोणताही उल्लेख नव्हता. दोन्ही देशांमध्ये कोअर ग्रुपची उच्चस्तरीय बैठक मालदीवची राजधानी मालेमध्ये आयोजित करण्यावर एकमत झालं होतं.

भारतीय सैनिकांची जागा कोण घेऊ शकतं?

भारतीय सैनिकांची जागा कोण घेणार? या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार मालदीवमध्ये सैनिकांच्या जागी सिविल ऑपरेटर किंवा माजी सैनिकांना तैनात केलं जाऊ शकतं. आमच्या देशात तैनात असलेले सैनिक एक्टिव सर्विसमध्ये नसतील, असं कि मुइज्जू सरकारने म्हटलय. मालदीव भारताचा एक महत्त्वाच आणि जवळचा शेजारी देश आहे. लक्षद्वीपपासून हे अंतर 70 नॉटिकल माइल आहे. हिंद महासागरात मालदीवच रणनितीक महत्त्व आहे. मुइज्जू सरकार सत्तेवर येण्याआधी भारत-मालदीवमध्ये चांगले संबंध होते. 2022 मध्ये ट्रेनिंगसाठी मालदीवमधून 900 पेक्षा जास्त नागरिक आले होते.

भारतीय सैनिकांना काय अल्टीमेटम दिलेलं?

मागच्यावर्षी झालेल्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांनी प्रचारात ‘इंडिया आऊटचा’ नारा दिला होता. मालदीवमध्ये परदेशी सैनिकांची काही गरज नाही, त्यांची उपस्थिती संप्रभुतेला धोका आहे, असं मुइज्जू सरकारने म्हटलं होतं. त्यांनी भारतीय सैनिकांना मालदीव सोडण्यासाठी 15 मार्चपर्यंतच अल्टीमेटम दिलं होतं. चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.