आधी पत्नीचा 150 कोटी रुपयांचा काढला विमा, नंतर समुद्रात फेकले…असा समोर आला प्रकार

| Updated on: Dec 05, 2024 | 1:39 PM

Insurance fraud: ली एक रेस्तरां चलवत होता. तो नेहमी आपले कर्मचारी आणि मालाचा पुरवठा करणाऱ्या लोकांना पैसे देत नव्हता. त्याच्यावर कर्जही झाले होते. त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले. त्याने ज्या महिलेशी लग्न केले, तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला दोन मुलेही होती.

आधी पत्नीचा 150 कोटी रुपयांचा काढला विमा, नंतर समुद्रात फेकले...असा समोर आला प्रकार
Insurance fraud
Follow us on

Insurance fraud: बदलेली जीवनशैली आणि निर्माण झालेल्या आजारांमुळे विमा काढणे आवश्यक झाले आहे. विमाचे महत्व सांगणारे अनेक विमा सल्लागार असतात. त्यांच्या सल्ल्यानंतर अनेक जण विमा काढत नाही, असे प्रकार भारतात दिसून येतात. परंतु चीनमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. नवऱ्याने पत्नीचा 150 कोटी रुपयांचा विमा काढला. त्यानंतर तिला समुद्रात फेकून दिले. मग दुर्घटना झाल्याचा दावा करत 150 कोटी रुपयांचा लाभ घेतला. परंतु त्याचा हा प्रकार उघड झाला आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली.

चार विमा पॉलिसी

चीनमधील लियाओनिंग प्रांतात राहणारा 47 वर्षीय ली याने मे 2021 मध्ये त्याच्या पत्नीला जहाजावरुन समुद्रात फेकून दिले. त्यापूर्वी ली याने पत्नीच्या नावाने चार विमा पॉलिसी काढल्या. त्याचा वारस म्हणून स्वत:च्या नावाची नोंद केली. या विम्यामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर त्याला 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 150 कोटी रुपये भरपाई मिळणार होते. त्यामुळे त्याने पत्नीला जहाजावरुन समुद्रात फेकून दिले.

ली याच्या पत्नीचा जहाजावरील अपघात असा ठिकाणी झाला ज्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. परंतु त्या जहाजावर एकूण 200 कॅमेरे होते. परंतु अपघातस्थळी कॅमेरा नव्हता. फॉरेंसिक तपासणीत महिलेच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसली. ली याने पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र लवकर घेतले. तसेच तीन दिवसांत अंतिम संस्कार केले. पोलिसांनी ली याचा खोटेपणा उघड करण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी ली याला मृत्यू प्रमाणपत्र घेण्यासाठी बोलवले आणि त्याच्या हालचालीवरील लक्ष ठेवले.

हे सुद्धा वाचा

कर्जही झाले होते…

ली एक रेस्तरां चलवत होता. तो नेहमी आपले कर्मचारी आणि मालाचा पुरवठा करणाऱ्या लोकांना पैसे देत नव्हता. त्याच्यावर कर्जही झाले होते. त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले. त्याने ज्या महिलेशी लग्न केले, तिचा घटस्फोट झाला होता आणि तिला दोन मुलेही होती. लग्नाच्या दोन महिन्यातच त्याने पत्नीच्या नावावर चार विमा पॉलिसी घेतल्या. रेस्तरांमधील कर्मचारी आणि शेजारील लोकांनाही या लग्नाची माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.

पोलिसांनी जहाजापासून लांब असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात त्या महिलेस ढकलण्यात आल्याचे दिसून आले. फुटेजमध्ये काळा कोट दिसत होतो. तो कोट ली याचा असल्याचे स्पष्ट झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने एका महिलेस बोलवल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने पोलिसांना खरी घटना सांगितली. त्याला विम्याचे पैसे तर मिळाले नाही, परंतु न्यायालयाने मृत्यूदंड दिला.