कोलंबो- श्रीलंकेत (Sri lanka) सरकारच्या विरोधातील उद्रेक रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे. संतापलल्या लोकांनी (anggry citizens)राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करत, राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले आहे. घरात आतपर्यंत नागरिक पोहचल्यानंतर, राष्ट्रपती तिथून निघाले असल्याची माहिती आहे. राष्टपती राजपक्षे (president Rajapaksa) हे देश सोडून पळून गेल्याचीही माहिती आहे. देशात कधीही आणीबाणी म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात येते आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रानिल विक्रमसिंघे यांनी स्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची आपतकालीन बैठक बोलावली आहे. लोकसभा अध्यक्षांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवर होणाऱ्या संघर्षात 100 हून जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Video footage of Sri Lankan protesters taking over President’s office in Colombo
हे सुद्धा वाचा? Buddi U Chandrasiri pic.twitter.com/FINwaaqUat
— NewsWire ?? (@NewsWireLK) July 9, 2022
श्रीलंकेतील सर्वोच्च वकिलांची सघटना, मानवाधिकार संस्था आणि राजकीय पक्षांच्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी कर्फ्यू हटवल्याची माहिती आहे. त्यानंतर देशात जोरदार विरोधी आंदोलने झाली. कोलंबो सहीत देशातील पश्चिमेच्या भागात सात ठिकाणी हा कर्फ्यू लावण्यात आला होता. यात नेगोंबो, केलानिया, मुगेगोडा, माऊंट लिविनिया, उत्तरी कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि मध्य कोलंबोचा समावेश होता. शुक्रवारी रात्रीपासून पुढझील सूचनेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पोलीस महानिरीक्षकांनी या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहनही केले होते.
Protesters of #Shrilanka having good time in President palace wonderful crockery amazing wine Drinking and Dining.#GoHomeGota #SriLanka #SriLankaProtests #SriLankaCrisis #GotabayaRajapaksa #lka #July9th #EconomicCrisisLK #අරගලයටජය pic.twitter.com/p6uAXmKKPc
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) July 9, 2022
या कर्फ्यूचा वकिलांच्या बार संघटनेने विरोध केला. हा क्र्फ्यू बेकायदेशीर आणि माधवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला होता. सरकार आणि राष्ट्रपती राजपक्षे यांना विरोध करण्याचा मूलभूत अधिकार देशातील नागरिकांना असल्याचा दावा या वकिलांनी केला होता. माधवाधिकार आयोगानेही हा कर्फ्यू कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले होते.
देशातील आर्थिक संकटाने नागरिक हैराम झाले आहेत. गेल्या काही काळापासून देशात गोटा गो गामा असे आंदोलन राष्ट्रपती राजपक्षे यांच्याविरोधात सुरु होते. या आंदोलकांना माजी क्रिेटर सनथ जयसूर्या याचाही पाठिंबा आहे.