वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला (Satya Nadella) यांना व्यक्तीगत जीवनात मोठा धक्का बसला आहे. त्यांचा 26 वर्षाचा मुलगा झैन नाडेलाचे (Zain Nadella) सोमवारी सकाळी निधन झाले. सत्या नाडेला आणि त्यांची पत्नी अनू यांच्यासाठी हा एक मोठा आघात आहे. सत्या नाडेला यांचा मुलगा झैन नाडेला जन्मपासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त होता. मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेल द्वारे झैन नाडेलाच्या मृत्यूची बातमी दिली. मायक्रोसॉफ्ट ही सॉफ्यवेअर क्षेत्रातील जगातील एक आघाडीची कंपनी आहे. सत्या नाडेला यांच्या रुपाने एक भारतीय वंशाचा व्यक्ती या कंपनीच्या प्रमुखपदावर आहे.
न्यूरो सायन्स सेंटरची स्थापना केली
सत्या नाडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO झाले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उत्पादनांच्या डिझायनिंगवर लक्ष केंद्रीत केले. जेणेकरुन दिव्यांग व्यक्तींनाही सहजतेने ती उत्पादन वापरता येतील. झैनचे पालनपोषण करताना आलेल्या अनुभवाचा आधार त्यांनी यासाठी घेतला. मागच्यावर्षी सत्या नाडेला यांनी झैन नाडेला न्यूरो सायन्स सेंटरची स्थापना केली. मेंदू संबंधित आजारांवर संशोधन करण्यासाठी हे सेंटर बनवण्यात आलं आहे. झैनने ज्या हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक काळ उपचार घेतले, ते रुग्णालयही सत्या नाडेलांच्या उपक्रमात सहभागी झाले आहे.
सेरेब्रल पाल्सी काय आजार आहे?
झैन नाडेलाला संगीताची आवड होती. त्याचं सुंदर हास्य आणि त्याने त्याच्या कुटुंबाला जो आनंद दिला, त्यासाठी कायम तो लक्षात राहीलं, असं चिल्ड्रन्स हॉस्पिटलने सीईओ जेफ यांनी सांगितलं. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे. मेंदूचा विकास व्यवस्थित होत नाही. या आजाराने ग्रस्त असलेली मुलं शिकण्यास सक्षम नसतात. त्यांची दृष्टी, ऐकण्याची, बोलण्याची क्षमता कमकुवत असते.
Microsoft CEO Satya Nadella’s Son, Zain, Dies At 26