Plane crash | नशिबाचा विचित्र खेळ! वेगवेगळ्या विमानात होते प्रियकर-प्रेयसी, एकाच दिवशी कोसळलं दोघांच विमान

| Updated on: Dec 22, 2023 | 1:51 PM

Plane crash | सध्याच्या जगात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा असे चमत्कार होतात, ज्यावर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही. निर्सगाच्या चमत्काराने आपण हैराण होतो. अशीच एक घटना इटलीच्या ट्यूरिन शहरात घडली.

Plane crash | नशिबाचा विचित्र खेळ! वेगवेगळ्या विमानात होते प्रियकर-प्रेयसी, एकाच दिवशी कोसळलं दोघांच विमान
Couple
Follow us on

नवी दिल्ली : देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. आपल्यासमोर अशा काही घटना घडतात, ज्यावर लगेच विश्वास बसणार नाही. पण खरच तो एक चमत्कार असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. इटलीच्या ट्यूरिन शहरात ही घटना घडली. एक जोडपं एकाच दिवशी वेगवेगळ्या विमानातून प्रवास करत होतं. कुणाच्या ध्यानीमनी नसताना एक विचित्र घटना घडली. दोघांच विमान परस्परापासून 25 मैल अंतरावर असताना क्रॅश झालं. सुदैवाने हे जोडप या भीषण अपघातातून बचावलं.

30 वर्षांचा स्टेफनो पिरिल्ली आणि त्यांची 22 वर्षाची भावी वधू एंटोनिएटा डेमासी एकाचदिवशी विमान अपघातातून बचावले. दोघे वेगवेगळ्या विमानात स्वार झाले होते. दुर्देवाने दोघांच विमान कोसळलं. सुदैवाने दोघे बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. या जोडप्याने इटलीच्या ट्यूरिनमध्ये मित्रांसोबत लंचला जाण्याचा प्लान केला होता. दोघांनी दोन लाइट टू सीटर विमानातून जाण्याचा निर्णय घेतला.

कधी झाला अपघात?

एका विमानात एंटोनिएटा आणि पायलट होता. दुसऱ्या विमानात स्टेफनो आणि को पायलट होता. परत येताना दाट धुकं होतं. त्यामुळे कन्फयूजन झालं. दोघांच्या विमानाच क्रॅश लँडिंग झालं. पण कमाल म्हणजे दोघेही या अपघातातून सहीसलामत बचावले.

आम्हाला काही समजेल, याआधीच….

आम्ही धावपट्टीच्या दिशेने जाताच धुक आणि अंधार होता. आसपास विजेच्या तारा आहेत, हे आम्हाला माहित होतं. आम्हाला काही समजेल, याआधीच आमच विमान गवतावर कोसळलं. दुर्घटनेनंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या. चौघांना रुग्णालयात नेण्यात आलं. पायलट आणि कोपायलटही व्यवस्थित आहेत.