काबूल : तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानातील अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, काबूल सोडण्याची वाट पाहणाऱ्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या मते, अपहरण झालेल्या लोकांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभारत सरकारने देखील यासंदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. अहवालानुसार, काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे.
हा अहवाल तेव्हा समोर आलाय जेव्हा, भारतीय हवाई दलाच्या C -130 जे विमानाने 85 भारतीयांसोबत उड्डाण केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विमानाने इंधन भरण्यासाठी ताजिकिस्तानमध्ये लँडिंग केलंय. काबूलमधील अधिकारी भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. हवाई दलाचे विमान भारतीय प्रवाशांना दुशान्बे, ताजिकिस्तानमध्ये सोडेल आणि नंतर ते एअर इंडियाच्या विमानाने देशात परत येतील.
Multiple Afghan media outlets report kidnapping by Taliban of persons awaiting evacuation from #Kabul. Among them are reported to be Indian citizens. No official confirmation of this, more details awaited
— ANI (@ANI) August 21, 2021
अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर अनेकजण देश सोडून जात आहेत. भारतीयांना घेऊनही वायूसेनेची विमानं मायदेशी परतत आहेत. दोन दिवसापूर्वी जवळपास 120 लोकांना घेऊन वायूसेनेचं विमान भारतात आलं होतं. त्यानंतर आजही 85 भारतीयांना घेऊन वायूसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून उड्डाण केलं.
तालिबानने काबूलची राजधानी ताब्यात घेतल्यानंतर तिथे निर्माण झालेल्या संकट काळात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. मंगळवारी, काबूलमधील भारतीय राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांसह 120 लोकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान अफगाणिस्तानातून भारतात पोहोचले. सोमवारी, दुसरे C-19 विमान सुमारे 40 लोकांना अफगाणिस्तानातून भारतात आणले, ज्यात भारतीय दूतावासाच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
भारत सरकार अधिकाधिक भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे काबूल विमानतळावरुन आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने आतापर्यंत आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. परंतु अंदाजे एक हजार भारतीय नागरिक वेगवेगळ्या शहरात आहेत, असा अंदाज आहे. यापैकी 200 शीख आणि हिंदूंनी काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे, अशी माहिती एनडीटीव्हीने दिली आहे.
संबंधित बातम्या
Afghanistan crisis : आधी राष्ट्रपती संकटात सोडून पळाले, आता भावाचीही अफगाणिस्तानशी गद्दारी!