5 लाख मुसलमान, 20 हजार व्हियतनामींसह 15 ते 20 लोकांचा खून केला. आता 47 वर्षानंतर या हत्याऱ्याचा हिशोब झालाय. 91 व्या वर्षी दोषी सापडला. ही कहाणी आहे कंबोडियाच्या खमेर रूज नेता खीऊ सम्फानची. ज्याच्या आदेशानंतर शहर कब्रस्थानात बदललीत. खमेर रूजच्या तीन वर्षांच्या शासनकाळात कंबोडियाची 25 टक्के लोकसंख्या ठार झाली.
ट्रीब्युनल कोर्ट ऑफ कंबोडियानं खमेर रुजच्या शासनकाळातील शेवटच्या नेत्याला दोषी ठरविलं. त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. कम्युनिस्ट नेता पोल पोटचे नेतृत्व कंबोडियातील सर्वात क्रूर शासन समजले जाते. सम्फानचं वय आता 91 वर्षे झालं. हा कंबोडियाचा राष्ट्रपती होता. 2018 मध्ये तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्यानं अपील केलं होतं. त्यात तो पुन्हा दोषी असल्याचा निर्वाडा देण्यात आलाय.
17 एप्रिल 1975 ते 7 जानेवारी 1979 या तीन वर्षे 8 महिने 20 दिवसांच्या शासनकाळात खमेर रूजनं तीन वर्षात कंबोडियात खुनांची नदी वाहविली. चीनच्या कम्युनिस्ट नेत्याच्या प्रभावामुळं पंतप्रधान पोट पोलनं मुसलमान, दुसऱ्या जातीचे लोकं तसेच बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. इतरांची लोकसंख्या कमी करण्यासाठी शहर साफ करण्यात आलीत. लोकांना मजुरी करण्यासाठी मजबूर करण्यात आले. त्यांना टार्चर करून उपासी मारले गेले.
खमेर रूज शासनकाळात गोळ्या खर्च होऊ नये म्हणून कुऱ्हाडीनं कापले जात होते. मुलांना या कामासाठी मजबूर केले जात होते. पोल पोट म्हणत होता, गवताला नष्ट करायचं असेल तर त्याला मुळासकट फेकून द्या. अशाप्रकारे संपूर्ण कुटुंब संपविण्यात आले. मुलांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करण्यात आलं. वटवृक्षावर डोकं आपटून त्यांना मारण्यात आलं.