लंडनः ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मलिकने (Muhammad Malik) दावा केला होता की, आपण काही ठरवून लग्न करणार नाही. तरीही त्याने स्वतःची जीवनसाथी (Life partner) शोधण्यासाठी शोध मोहीम आखली. आपल्या जीवनसाथीसाठी त्याने ब्रिटेनच्या रस्त्यावर बोर्ड लावले आणि त्यात लिहिले की, आपल्याला लग्न (Marriage) करायचे आहे, त्यासाठी मी जीवनसाथीच्या शोधात आहे. त्यानंतर 29 वर्षाच्या मोहम्मदबरोबर लग्न करण्यासाठी 5 हजार मुलींनी संपर्क साधला. मोहम्मदला पाच हजार मुलींंनी त्याला संपर्क साधल्यावर मोठी गम्मत आली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्याच्या पोस्टवर अनेक लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याचे पहिले लग्न झाले असणार अशीह कमेंट टाकली आहे.
लग्नासाठी त्याला पाच हजार मुलींनी त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यांच्या असे लक्षात आले की, मोहम्मद मलिकेने डेटिंग अॅपसाठी हा स्टंट केला होता. त्यानंतर ट्विवटरवरही मोहम्मद मलिकने लिहिले आहे की, अनेकजण त्याला मुस्लिम डेटिंग अॅपवर सर्च करतात. त्यानंतर सोशल मीडियावर असणाऱ्या लोकांनी ठामपणे सांगितले की, ही सगळी स्टंटबाजी आहे तीही Muzmatch App साठी.
वधूच्या शोधासाठीच्या जाहिरातीत त्याने आपला फोटोही लावला होता. तर सोशल मीडियावर findmalikAwife हा हॅशटॅगही खूप चालला आहे. त्यानंतर findMALIKwife.com ही वेबसाईटही त्याने बनविली होती. काही वेब पोर्टलने सांगितले की, मोहम्मद मलिक हा लंडनमध्ये राहणारा आहे. त्याने आपल्या लग्नाची ही जाहिरात शहरातील अनेक ठिकाणी लावली होती. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, मला अॅरेंज मॅरेजापासून वाचवा.
त्याची जाहिरात बघून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्यातरी त्यामध्ये काहीनी लिहिले आहे की, कदाचित हे महाशय हे आधीपासूनच विवाहित आहेत. त्यामुळे FindMalikAWife हे कॅंपेन हे फर्जीवाडा असल्याचे माहिती पडले आहे सगळ्यांना. त्यामुळे आता findmalikawife वेबसाईटवर findmalik on muzmatch ही muzmatch वेबसाईटची टॅगलाईन आहे. जिथे सिंगल मुस्लिम मिळतात. findmalikawife.com वर ये ही लिहिले आहे की, आम्ही हे म्हणतोय की, आपण मस्जीदीमध्ये भेटलो होतो. त्यामुळे Muzmatch चे निर्माते शहशाद यूनिसनेही ट्विवट केले आहे की, सिक्रेटस् आऊट झाले आहे.
संबंधित बातम्या