स्पेस एजन्सी NASA ने चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याच्या त्यांच्या मोहिमेची (Human Mission to Moon) 2025 पर्यंत पुढे ढकललं आहे. NASA ने यापूर्वी 2024 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली होती. पण त्याला आता उशीर होतोय. नासाचे प्रशासक बिल नील्सन यांनी या मोहिमेच्या विलंबाबाबत एक घोषणा केली. ते म्हणाले की, काँग्रेसने चंद्रावरील त्यांच्या मोहिमेसाठी लँडिंग सिस्टम विकसित करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. (NASA Moon mission delayed again)
मात्र, जेफ बेजोस (Jeff Bezos) ची रॉकेट कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ (Blue Origin) च्या कायदेशीर आव्हानांमुळेही वेळ लागत आहे. ब्लू ओरिजिनने ऑगस्टमध्ये नासाविरुद्ध खटला दाखल केला होता. निल्सन म्हणाले की, NASA त्याच्या चंद्र रॉकेट ‘स्पेस लॉन्च सिस्टम’, किंवा SLS चे पहिले चाचणी उड्डाण पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लक्ष्य करत आहे (NASA Moon Mission Launch Schedule). त्यात कोणीही असणार नाही. अंतराळवीर दुसऱ्या आर्टेमिस फ्लाइटवर जातील, जे चंद्राच्या मागे जाईल, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. चंद्रावर उतरण्याची मोहीम 2025 पर्यंत पूर्ण होईल.
ब्लू ओरिजिनने दावा केला होती की NASA ने ब्लू ओरिजिनला चंद्र मोहिमेसाठी अनेक कंत्राटे देणार आहे. पण, इलॉन मस्कच्या (Elon Musk) कंपनी स्पेसएक्सला $2.91 बिलियनचे कंत्राट देण्यात आले. या नुकसानीबाबत जेफ बेझोस यांच्या कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला होता. जेफ बेझोसचे ब्लू ओरिजिन हे प्रकरण नासा (Moon Manned Mission) कडे हरले. कोर्टात फेडरल न्यायाधीश रिचर्ड हार्टलिंग यांनी आपला निर्णय देताना नासावरील आरोप फेटाळले असल्याचे सांगितले.
SpaceX : 200 दिवसांची अंतराळ मोहीम पुर्ण करून चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले, बघा VIDEO#SpaceX #NASA #Astronauts #SPACEMAN #Spacemission https://t.co/nI7SPgz7zd
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2021
Other News