वॉशिंग्टन: जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासानं मंगळ मोहिमेविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत नासाच्या Ingenuity हेलिकॉप्टरचं चौथं उड्डाण पूर्ण केल्याचं पाहायला मिळतं. विशेष बाब म्हणजे यामध्ये हेलिकॉप्टरच्या पाती फिरल्यामुळे निर्माण होणारा आवाज देखील नासाच्या रोव्हरनं रेकॉर्ड केला आहे. (NASA Perseverance Rover on Mars sent video with Audio first time of Helicopter Flight)
नासाच्या मंगळ ग्रहावरील रोव्हरनं पहिल्यांदाच हेलिकॉप्टरच्या पात्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे.नासानं हा व्हिडीओ 7 मे रोजी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नासाच्या मंगळ ग्रहावरील रोटोरक्राफ्ट हेलिकॉप्टरनं मंगळ ग्रहावरील चौथं उड्डाण यशस्वीरित्यापूर्ण केलं. हा व्हिडीओ एकूण तीन मिनिटांचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरच्या उड्डाणापासून हळूहळू आवाज येत जातो. रोटोरक्राफ्टची पाती 2400 आरपीएमच्या वेगान फिरतात त्यामुळे निर्माण होणारा आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला भेटतो.
?? New sounds from Mars: Our @NASAPersevere rover caught the beats coming from our Ingenuity #MarsHelicopter! This marks the first time a spacecraft on another planet has recorded the sounds of a separate spacecraft.
?? Turn the volume up: https://t.co/o7zG6mQJzx pic.twitter.com/s8Hm3dhcgg
— NASA (@NASA) May 7, 2021
नासाच्या मंगळ मोहिमेच नेतृत्व करणाऱ्या अभियंत्यांमध्ये हेलिकॉप्टरच्या पात्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. कारण हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळी नासाचा प्रीझर्व्हन्स रोव्हर 262 फूट म्हणजेच 80 मीटर अंतरावर होता. मात्र, रोव्हरमधील सुपरकॅम मार्स मायक्रोफोनमध्ये आवाज रेकॉर्ड झाला आहे.
फ्रान्समधील शास्त्रज्ञ डेविड मिमोऊन यांनी रोव्हरनं नासाकडे पाठवलेल्या व्हिडीओतील आवाज ही महत्वपूर्ण गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. नासाच्या रोव्हरमध्ये लावण्यात आलेल्या सुपर कॅम मार्स मायक्रोफोननं व्हिडीओ टिपला आहे. सुपरकॅमचा वापर मंगळग्रहावरील दगडांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येतो. मंगळ ग्रहावरील आवाज असणारा व्हिडीओ हा आमच्यासाठी मगंळ मोहितमेतील सुवर्णक्षण असल्याचं डेव्हिड मोमिऊन यांनी म्हटलं आहे. मंगळावरील वातावरणात 96 टक्के कार्बन डायक्साईड आहे.
Photos : NASA च्या एका स्पेस सूटची किंमत 80 कोटीच्या पुढे, ‘ही’ वैशिष्ट्यं वाचून अवाक व्हाल
मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड, नासाच्या रोवरनं पाठवलेल्या फोटोची एकच चर्चा
(NASA Perseverance Rover on Mars sent video with Audio first time of Helicopter Flight)