200 दिवसांच्या अंतराळ मोहीम (Space mission) पुर्ण करून चार अंतराळवीर मंगळवारी SpaceX स्पेसक्राफ्टसह पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या (Florida coast) किनारपट्टीवर, गल्फ ऑफ मेक्सिकोच्या (Gulf of Mexico) हद्दीत मंगळवारी पहाटे (स्थानीक वेळ) स्पेसक्राफ्ट यशस्वीपणे उतरले. या स्पेसक्राफ्टचा ड्रॅगन क्रू (dragon crew) होते नासाचे (NASA astronauts) अंतराळवीर शेन किमब्रो (Shane Kimbrough) आणि मेगन मॅकआर्थर (Megan McArthur), जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर अकिहिको होशिडे (Japan Aerospace Exploration Agency astronaut Akihiko Hoshide) आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर थॉमस पेस्केट (European Space Agency astronaut Thomas Pesquet).
Smiles, thumbs up, and peace signs. The @SpaceX Crew-2 astronauts are happy to be home after six months in space. pic.twitter.com/W9ziABkq0k
— NASA (@NASA) November 9, 2021
चार अंतराळवीरांनी सोमवारी सकाळी पृथवीवर परत येणे अपेक्षित होते, पण रिकव्हरी झोनमधील (recovery zone) जोराच्या वाऱ्यामुळे त्यांना परत येण्यास उशीर झाला.“या जादुई दृश्यासह आणखी एक रात्र. कोण तक्रार करेल? मी आमचे स्पेसशिप मीस करेन!” पेस्केटने रविवारी एका व्हिडिओ ट्विट करत म्हटले. या व्हिडिओमध्ये अंतराळातून पृथवीचे रात्रीच्या वेळी चमकणारे दिव्यांसारखे दृश्य दिसत होते.
अनडॉक करण्यापूर्वी, नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होण्याची वाट पाहत असलेले जर्मन अंतराळवीर मॅथियास मॉरेर (German astronaut Matthias Maurer) यानी ट्विट केले की दोन क्रू स्पेस स्टेशनवर ओव्हरलॅप होणार नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे परंतु “आम्हाला विश्वास आहे की तुम्ही सर्व काही छान आणि नीटनेटके ठेवाल.” दीड वर्षांत नासासाठी ही SpaceX चे चौथे क्रू फ्लाइट असेल.
The @SpaceX Crew Dragon spacecraft is seen as it returns from space off the cost of Florida with #Crew2 astronauts @astro_kimbrough, @Astro_Megan, @Thom_astro, & @Aki_Hoshide after spending over six months aboard @Space_Station! More? https://t.co/274TuZrwkS pic.twitter.com/yg61yGCuHy
— NASA HQ PHOTO (@nasahqphoto) November 9, 2021
Other News
(NASA SpaceX spacecraft Dragon crew lands on earth in Florida after 200 days space mission)