Marathi News International Neighboring country of India, land, electricity, water, treatment, education are all free; only this one condition
भारताच्या या शेजारी देशात जमीन, वीज, पाणी, उपचार, शिक्षण सर्व मोफत; फक्त ही एक अट
भारताच्या शेजारी अनेक देश आहेत जे आपल्या निसर्गाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. पण एक देश असा देखील आहे जिथे तुम्हाला घर बांधायचे असेल तर तुम्हाला जमीन फुकट मिळेल, जेवण फुकट मिळेल इतकंच नाही तर वीज आणि शिक्षणही मोफत आहे. उपचार देखील पूर्णपणे मोफत केले जातात. फक्त त्याची आपल्या लोकांसाठी एकच अट असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या देशात कोणी भिकारी सापडणार नाही. इथे प्रत्येकासाठी घर आहे. आरोग्य सेवा सर्व नागरिकांना मोफत आहेत. इतर देशात उपचार करण्यासाठी देखील आरोग्य विभाग खर्च देते. या देशाचं नाव आहे भूतान.