ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांचे भारताबाबत महत्त्वाचे वक्तव्य

| Updated on: Jul 05, 2024 | 5:06 PM

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. निवडणुकीतील विजयानंतर केयर स्टॉर्मर यांनी विजयी भाषण केले. बदललेला मजूर पक्ष देशसेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टॉर्मर यांचे भारताबाबत महत्त्वाचे वक्तव्य
Follow us on

UK Elections 2024: ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे. सुनक यांचा पक्ष कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पराभवाचा झटका बसला आहे. 650 पैकी 400 जागांवर विरोधी पक्षाने विजय मिळवला आहे. ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. सुनक यांना त्यांची जागा राखण्यात मात्र यश आले आहे. उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थलर्टन जागा त्यांना 23,059 मतांनी जिंकलीये.

सुनक यांची राजीनामा

निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. “मी तुमचा राग, तुमची निराशा ऐकली आहे आणि मी या पराभवाची जबाबदारी घेतो.” सुनक यांनी स्टॉर्मर यांचे अभिनंदन केले आहे.

केयर स्टारर काय म्हणाले?

ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे लेबर पार्टीचे केयर स्टॉर्मर यांनी हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रस या जागांवर विजय मिळवलाय. लेबर पार्टीच्या विजयावर 61 वर्षीय स्टॉर्मर म्हणाले की, ‘मी तुमचा आवाज होईन, मी तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमच्यासाठी दररोज लढेन.’ स्टॉर्मर यांनी विजयानंतर शुक्रवारी सकाळी विजयी भाषण केले.

मानवाधिकार वकील कीर स्टॉर्मर शुक्रवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. स्टॉर्मर यांनी मजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या लोकांशी असलेल्या संबंधांमध्ये सकारात्मक बदलाचा पुरस्कार केला आहे. स्टॉर्मर यांनी त्यांच्या पक्षाला मजबूत जनादेश मिळाल्यास भारतासोबत मुक्त व्यापार करार (FTA) यासह नवीन धोरणात्मक भागीदारी करण्याचे वचन दिले होते. स्टॉर्मर यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने ब्रिटिश सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. स्टॉर्मर यांनी विजयी रॅलीत समर्थकांना सांगितले की, ‘बदल आता सुरू झाला आहे. माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याप्रमाणे स्टार्मर यांनीही ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.