New Strain of Coronavirus UK : कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

| Updated on: Dec 24, 2020 | 11:26 AM

कोरोनाच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण आशिया खंडात आढळून आलाय. त्यामुळे आशिया खंडातील देशांना आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

New Strain of Coronavirus UK : कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला
Follow us on

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. अशात कोरोनाच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण आशिया खंडात आढळून आलाय. त्यामुळे आशिया खंडातील देशांना आता मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झालेल्या एक रुग्ण सिंगापूरमध्ये सापडला आहे. सिंगापूर सरकारनेही या बातमीची पुष्टी केली आहे. (A patient infected with a new strain of corona virus found in Singapore)

सिंगापूरमध्ये विदेशातून परत आलेल्या प्रवाशांपैकी विलगीकरणात ठेवण्यात आलेले 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे सर्वजण युरोपवरुन सिंगापूरमध्ये आले होते. या प्रवाशांना सिंगापूरमध्ये पोहोचताच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या B117 विषाणूचा सामुहिक संक्रमणाचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं म्हटलंय.

युरोपवरुन आलेले 31 जण पॉझिटिव्ह

युरोपवरुन सिंगापूरला आलेले 31 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 11 जणांना कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झाली आहे. हे सर्वजण 17 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान युरोपवरुन आले होते. सिंगापूरमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची लागण झालेला रुग्ण 6 डिसेंबरला सिंगापूरमध्ये आला होता. त्याचा कोरोना अहवाल 8 डिसेंबरला पॉझिटिव्ह आहा. त्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. पण सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

भारतात ब्रिटनहून आलेले 20 जण पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल 20 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल. दरम्यान याबाबत घाबरण्याची गरज नाही. पण आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणाले.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार धोकादायक- जॉन्सन

बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जॉन्सन यांनी कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत भाष्य केलं. ‘ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने पसरु शकतो’, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये सध्या धान्याचा मुबलक साठा आहे. साठवणूक आणि पुरवठा यंत्रणेची साखळी मजबूत असल्याचंही जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या:

New Strain of Coronavirus : ब्रिटनच नाही तर ‘या’ देशांतही आढळली कोरोनाची नवी प्रजाती, भारताची स्थिती काय?

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

A patient infected with a new strain of corona virus found in Singapore