नवी दिल्लीः इराणहून चीनकडे (China) जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब (Bomb in Plane) असल्याची बातमी समोर आली आहे. ही माहिती मिळताच विमानाने (Airplane) भारतात नवी दिल्लीत विमान लँड करण्याची परवानगी मागितली. मात्र भरताने ही परवानगी नाकारली. त्यानंतर हे विमान पुढील प्रवासास निघाले असून सध्या भारतीय एअरस्पेसच्या बाहेर गेले असल्याची माहिती आहे. या विमानात बॉम्ब आहे का ते हायजॅक झाले आहे, यावर अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने ईराणमधील तेहरान येथून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर फ्लाइटमध्येच बॉम्ब असल्याची माहिती समोर आली.
बॉम्बची माहिती मिळाली तेव्हा विमान दिल्लीच्या आसपास होते. त्यामुळे पायलटने दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.
सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली एअरपोर्टने ही परवानगी नाकारली. त्यामुळे याच ठिकाणी खूप वेळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर हे विमान पुढे निघून गेले.
सध्या हे विमान भारतातील एअरस्पेसच्या बाहेर गेले आहे.जयपूर विमानतळावर विमानाने लँडिंगची परवानगी होती. मात्र ती नाकारण्यात आली.
दरम्यान, संपूर्ण जगाचं लक्ष या विमानाकडे लागलेलं आहे. विमान हायजॅक केलंय का? अशीही शंका उपस्थित केली जातेय. भारतीय लायू सेनेने सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचललं आहे.
भारतीय वायुसेनेने तडकाफडकी पंजाब आणि जोधपूर एअरबेसमधून एक सुखोई विमान पाठवले आहे. आकाशातील या संशयास्पद विमानावर आपले सुखोई विमान नजर ठेवून असेल.
मागील तीन तासांपासून हे विमान आकाशात आहे. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास विमानाने दिल्लीत लँडिंगची परवानगी मागितली होती.
या विमानात बॉम्ब असल्याचा अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. महान एअरलाइन्सचे W-581 असे हे विमान चीनमधील ग्वांग्झू एअरपोर्टकडे जात आहे.
‘Bomb threat’ onboard Iranian plane over Indian airspace triggers alert, IAF jets scrambled
Read @ANI Story | https://t.co/2vKAxcevDc#IAFPlanesScrambled #Bombthreat #IAF #China #Iran #IAFJets pic.twitter.com/w5hhXdnHD6
— ANI Digital (@ani_digital) October 3, 2022