News9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी गोल्डेन बॉल सेशनची आज जोरदार सुरुवात झाली. यावेळी TV9चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी पुन्हा एकदा भारत आणि जर्मनीच्या संबंधांतील अतूट नात्यावर प्रकाश टाकला. भारत आणि जर्मनी मिळून जगाचं भवितव्य ठरवत असल्याचं आजच्या या सेशनमधून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, असं टीव्ही9चे एमडी आणि सीईओ बरूण दास यांननी सांगितलं. बरुण दास यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबतच जर्मनीत बाडेन वुर्टेमबर्गचे मंत्री- राष्ट्रपती विनफ्रेड क्रेशमैन यांचं स्वागत केलं. तसेच फेडरल मंत्री सेम ओजदेमिर यांच्या भाषणातील अनेक गोष्टींचा उल्लेख करत त्यांचं कौतुक केलं.
जर्मनीचे अन्न आणइ कृषी मंत्री म्हणून सेम ओजदेमिर यांनी महत्त्वाच्या गोष्टींकडे इशारा केला आहे, असं बरुण दास म्हणाले. भारत आणि जर्मनी एकत्र येऊन कशाप्रकारे अपेक्षांनी संपन्न भविष्याला सुदृढ केलं जाऊ शकतं या मुद्द्यांवरही त्यांनी जोर दिला.
बरुण दास यांनी या दरम्यान डीजिटल भविष्याबाबत कायदे पंडित आणि यूरोपियन यूनियनचे माजी ऊर्जा मंत्री गुंथर ओटिंगर यांचे व्हिजन किती महत्त्वाचं आहे हेही स्पष्ट केलं. आजच्या सत्रात सर्वच वक्त्यांनी महत्त्वाच्या विषयावर अत्यंत उपयोगी गोष्टी मांडल्या. यावेळी त्यांनी सर्व पाहुणे आणि वक्त्यांचे आभार मानले. आजचं मंथन जगासमोरील आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी ठरेल, अशी आशाही बरुण दास यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी फोर्ड मोटर्सचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचं एक वाक्य उद्धृत केलं. त्यांचं हे वाक्य मला खूप आवडतं. त्यांचा हा विचार जगाच्या विकासाबरोबरच मानवतेच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सोबत येणं ही एक सुरुवात आहे. सोबत राहिल्याने प्रगती होते आणि सोबत काम केल्याने यश मिळतं, असं हेनरी फोर्ड म्हणाले होते, असं बरुण दास यांनी सांगितलं. बरुण दास यांनी हेनरी फोर्ड यांचा हा विचार आधी जर्मन आणि नंतर इंग्रजी भाषेत ऐकवला.
आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत, त्या बाडेन-वुर्टेमबर्ग केवळ उद्योगशीलतेत नवीन विचार आणण्यासाठीच ओळखलं जात नाही तर बाहेरच्या लोकांचं स्वागत करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. बाडेन-वुर्टेमबर्गने जागातील इकोनॉमीत महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षी वस्तू आणि सेवा क्षेत्रात चांगलं उत्पन्न मिळवलं आहे, असं सांगतानाच बरुण दास यांनी बाडेन-वुर्टेमबर्गच्या मेहनती नागरिकांचं कौतुक केलं.
1968मध्ये माझा जन्म झाला नव्हता. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 20 वर्ष झाले होते. 20 वर्षाचं हे युवा राष्ट्र होतं. तेव्हापासून जर्मनीच्या बाडेन-वुर्टेमबर्गशी भारतातील महाराष्ट्राचं विशेष नातं आहे. बाडेन-वुर्टेमबर्गचा मुंबईशी सिस्टर सिटीसारखा संबंध प्रस्थापित झाला आहे. विविध क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्यासाठी दशकापासून चालत आलेलं हे एक असं नातं आहे, असंही त्यांनी म्हटलं.
यावेळी बरुण दास यांनी उदाहरण म्हणून महाराष्ट्र आणि बाडेन-वुर्टेमबर्गच्या कराराचा उल्लेख केला. हा करार कुशल कार्यकर्त्यांच्या भरतीसाठीचा होता. त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम जर्मनीशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि यशासाठी महत्त्वाची ठरतील, अशी आशा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.